Google Pay सांगणार अ‍ॅपवरील तुमच्या मागील वर्षाचा खर्च, जाणून घ्या तपशील

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   स्पॉटिफाई सारख्या सर्व्हिसने ईयरली रिव्यूचा ट्रेंड लोकप्रिय केला आहे. आता बर्‍याच अ‍ॅप्सनी ‘ ईयर-इन -रिव्यू’चा ट्रेंड स्वीकारला आहे. गुगलच्या पेमेंट प्लॅटफॉर्म गूगल पे किंवा GPay नाव देखील या यादीमध्ये समाविष्ट केले गेले आहे. आपण Google पे मध्ये 2020 ची समरी पाहू शकता. यात गुगल पेवर बरीच माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी आपण किती पैसे खर्च केले हे देखील सांगण्यात आले आहे.

Google पेच्या होम पेजवर ईयर-इन-रिव्यू ऑप्शन दिसेल. हे आपल्या रीसेंट ट्रॅन्जेक्शन लिस्टच्या वर असेल. हा पर्याय निवडताच आपल्याला सांगितले जाईल की, आपण किती काळ Google पेशी जोडलेले आहात. त्याचप्रमाणे, आपल्याला वेगवेगळ्या कार्डांद्वारे बर्‍याच गोष्टी सांगितल्या जातील. या कार्डांद्वारे अ‍ॅपद्वारे पैसे देऊन आपण कोणत्या स्थानिक व्यवसायाला मदत केली ते सांगितले जाईल. यासह, मागील महिन्यात आपण किती पैसे खर्च केले याबद्दल आपल्याला माहिती मिळेल. त्याचप्रमाणे एका कार्डामध्ये तुम्हाला सांगण्यात येईल की, गेल्या वर्षी तुम्ही Gpay च्या माध्यमातून किती मित्रांशी इंटरॅक्ट झालात आणि किती व्यवहार केले. एका कार्डच्या माध्यमातून तुम्हाला हेही कळेल की वर्षभर तुम्ही कॅशबॅकद्वारे किती पैसे वाचवले आहेत.

अंतिम कार्डमध्ये आपल्याला Google पेद्वारे यावर्षी किती पैसे खर्च केले गेले ते सांगितले जाईल. तसेच येथे आपल्याला वर्षाच्या प्रत्येक महिन्याचा बार ग्राफ दिसेल. आपण कोणत्या महिन्यात किती खर्च केला याची माहिती मिळेल. हा डेटा 19 डिसेंबर 2020 पर्यंतच्या आपल्या अ‍ॅक्टिव्हिटीवर आधारित आहे. यानंतर खर्च झालेल्या पैशांचा त्यात समावेश होणार नाही.