Google नं डुडलद्वारे ‘पुलं’ना वाहिली आदरांजली

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – गुगल नेहमीचं प्रत्येक दिनानिमित्त विशेष डुडल प्रसिद्ध करत असते आज प्रख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचा जन्मदिन. त्यानिमित्त गुगलने आपल्या होमपेजवर पुलंचा फोटो असलेले डुडल शेअर करुन आदरांजली वाहिली आहे. या डुडलमध्ये पुलं हे पेटी वाजवताना दिसत आहेत.

पुलंचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबईत झाला होता.त्यांनी मराठी साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा विविध क्षेत्रात आपल्या कौशल्याची छाप पाडली होती.पुलंची व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक, गोळाबेरीज, असा मी असामी, अपूर्वाई, पूर्वरंग आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. तसेच पुलंनी गुळाचा गणपती, वंदे मातरम, दूधभात आदी चित्रपटात काम केले होते. पुलंनी आकाशवाी आणि दूरदर्शनवरही काम केले होते. ते १९५५ मध्ये आकाशवाणीमध्ये कामाला लागले होते. १९५९ मध्ये पु.ल. देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले होते. तसेच दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.