Google चं ‘हे’ फिचर वापरताय? तर तुम्हाला भरावे लागतील इतके पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सध्या अनेक स्मार्टफोन्समध्ये दर्जेदार कॅमेरा दिला जातो. या कॅमेराच्या माध्यमातून फोटोही काढले जातात. पण हे Save करण्यासाठी तुम्ही जर Google Photos चा वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण आता तुम्हाला Unlimited फ्री स्टोरेज मिळणार नाही.

Google Photos मध्ये यापूर्वी Unlimited फ्री स्टोरेज दिला जात होता. मात्र, आता कंपनीने आपल्या नियमात बदल केला असून, 1 जूनपासून यूजर्सला Google Photos मध्ये फोटो-व्हिडिओ स्टोअर करण्यासाठी केवळ 15 GB फ्री स्टोरेज मिळणार आहे. XDA Developers ने दिलेल्या रिपोर्टनुसार, Pixel 2 आणि त्याच्यावरील Pixel डिव्हाईस युजर्ससाठी हा नियम लागू नसेल.

पिक्सल युजर्सला Google Photos वर अनलिमिटेड High Quality Photo Backup ची सुविधा मिळत राहणार आहे. मात्र, ज्यांच्याकडे पिक्सल फोन नाही, त्यांना Google One सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. यामध्ये 100 GB साठी 19.99 डॉलर्स मोजावे लागतील. तसेच निश्चित तारखेपूर्वी Google Photos वर अपलोड केलेले व्हिडिओ आणि फोटोला 15 GB स्टोरेजची मर्यादा लागू नसेल. त्यामुळे युजर्सने आधीच फोटो आणि व्हिडिओ स्वरुपात असलेल्या फाईल्स अपलोड करणे गरजेचे आहे.

गेल्या वर्षी झाली होती घोषणा

मागील वर्षी कंपनीने याबाबत घोषणा केली होती. कंपनीने सांगितले होते की, Google Photos वर फ्री स्टोरेजला 15 GB पर्यंत मर्यादित केले जाणार आहे. अतिरिक्त स्टोरेज हवे असल्यास यूजर्सला Google One चे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.