Google आणि Apple अ‍ॅप स्टोरवरून हटवले 7 धोकादायक अ‍ॅप्स, तुम्ही तात्काळ फोनमूधन डिलीट करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अवास्टच्या सायबर सिक्युरिटी रिसर्चर टीमने ७ मॅलिशस ॲप्सची माहिती उघडकीस आणली आहे. गुगल प्ले स्टोर आणि ॲपल ॲप स्टोरवरुन वापरकर्त्यानकडून २४ लाख वेळा या ॲप्सला डाउनलोड करण्यात आले आहे. यामाध्यातून ॲप बनवणाऱ्याने ५०००००० डॉलरची कमाई केली आहे. प्रसिद्ध टिकटॉक आणि इन्स्टाग्राम सारख्या प्रोफाईल्सने या ॲप्सला डाउनलोड केलं आहे.

अवास्टर वरील एका ब्लॉग नुसार, टीमने ३ अशा प्रोफाईलची माहिती मिळवली आहे. जे टिकटॉक वर मॅलिशस ॲप्सला वेगाने डाउनलोड करण्यासाठी दबाव बनवत होते. टिकटॉकवर अशा प्रोफाइलवर ३ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. रिसर्चर टीमने इंस्टग्रामवर एका अशा प्रोफाइलची माहिती उघड केली आहे. त्यामध्ये एकावर ५००० हजार हुन जास्त फॉलोवर्स आहेत. अशा ७ ॲप्सची माहिती अवास्टने गुगलला दिली आहे.

ZDNet ने सांगितले की, गुगल प्ले स्टोर वरुन ThemeZone, Shawky App Free, Shock My Friends, Ultimate Music Downloader, Free Download Music या ॲप्सला काढून टाकण्यात आले आहे. तथापि, Shock My Friends – Satuna, 666 Time, ThemeZone, Live Wallpapers आणि shock my friend tap roulette v ॲप्स ना ॲपल स्टोरीवरुन काढण्यात आलं आहे. हे ॲप्स तरुणांना लक्ष करत होते. वारंवार ॲप शो करत होते. त्यामुळे वापरकर्त्यांना अतिरिक्त सर्विससाठी २ ते १० डॉलर पर्यंत चार्ज करावा लागत होता. यामध्ये काही जाहिराती सुद्धा दाखवल्या जात असल्याने ते यातून पैसे कमावत होते.

यासंदर्भात अवास्टच्या थ्रेट अनॅलिस्ट जॅकब वावरा म्हणाले, ज्या ॲप्सला आम्ही शोधून काढले. ते गुगल आणि ॲपल ॲप पॉलिसीजचे उल्लंघन करत असल्याचं आम्हाला प्राथमिक स्वरुपात आढळून आले. म्हणून गुगल आणि ॲपल ॲप स्टोरवरुन ते हटवण्यात आले. तुमच्या मोबाइल फोनमध्ये हे ॲप्स असतील तर तातडीने डिलीट करा, असे सुद्धा त्यांनी सांगितलं.