×
Homeक्राईम स्टोरीकामाची गोष्ट ! App बनावट आहे कि Fake? डाउनलोड करण्यापूर्वी 'हे' लक्षात...

कामाची गोष्ट ! App बनावट आहे कि Fake? डाउनलोड करण्यापूर्वी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही वापरत असलेल्या android मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अ‍ॅप्स (Apps) असतात, ते अ‍ॅप्स गूगल प्ले स्टोअरच्या (Google Play Store) माध्यमातून डाउनलोड करता येते. अशात Google Play Store वरुन Apps डाउनलोड करत असताना ते Apps बनावट स्वरूपाचं आहे का ? Fake app आहे का ? हे तपासणं गरजेचं आणि महत्वाचं आहे. Fake apps च्या द्वारे हॅकर्स (Hackers) वापरकर्त्यांना भरपूर नुकसान देखील पोहचवू शकतात. म्हणून Apps डाउनलोड करण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष ठेवण्याची आवश्यकता असते.

Fake apps हे देखील बरोबर खऱ्या Apps सारखं दिसत असतात.
म्हणून Fake App तर डाउनलोड होत आहे का बघून त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
समजा त्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये अथवा आयकॉनमध्ये गोंधळ असू शकतो.
मोबाईलवर एखादे Apps डाउनलोड करण्याअगोदर गूगल प्ले स्टोअरवरच्या डेव्हलपरला व्हेरिफाय करणे आवश्यक आहे.
बनावट अ‍ॅप्स तयार करणारे अनेकवेळा मूळ अ‍ॅप डेव्हलपरचं नाव कॉपी करतात. विशेष म्हणजे मूळ अ‍ॅप्स च्या डेव्हलपरचे तपशील सहजपणे मिळतात. तसेच, बनावट अ‍ॅप तयार करणाऱ्यांचे तपशील शो होत नाहीत.

या दरम्यान, आपल्या मोबाईलमध्ये कोणताही बनावट अ‍ॅप डाउनलोड केल्याने वापरकर्ते पूर्णपणे हॅकर्सच्या जाळ्यात सापडतात. म्हणून उगीच कुठलाही अ‍ॅप्स डाउनलोड करणे टाळले पाहिजे. तसेच, कोणत्याही अनोळखी एसएमएस अथवा लिंकवर देखील क्लिक करू नका. याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. दरम्यान, App डाउनलोड करताना एकदा त्या अ‍ॅपच्या डाउनलोडची संख्याही चेक करा. मूळ App च्या डाउनलोडची संख्या कोट्यवधींमध्ये असेल, तर बनावट अ‍ॅपच्या डाउनलोडची संख्या अत्यंत कमी असणार आहे. मुख्यतः मूळ अथवा बनावट App समजण्यासाठी App चे रिव्ह्यू वाचणंही आवश्यक असणार आहे. रिव्ह्यूद्वारे अ‍ॅपबाबत अंदाज येतो. बनावट अ‍ॅप्स Download केल्याने व्यक्ती पूर्णपणे हॅकर्सच्या जाळ्यात सापडतात. म्हणून कुठलंही App Download करणे टाळावे. आणि एसएमएस अथवा Link वर देखील क्लिक करू नये.

हे देखील वाचा

Pune Crime News : इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू, विमानतळ परिसरातील घटना

चालत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची गळा चिरून हत्या, प्रियकरानं जेलमध्ये घेतला गळफास

भाजपचा CM ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही, सतत मागत राहता, …यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?

तसेच फेसबुक पेज ला लाईक करा

 

ट्विटर ला देखील फॉलो करा
Must Read
Related News