Google नं ‘हे’ 24 App काढले, चीनला पाठवत होते ‘डाटा’, तुम्ही देखील करा ‘डिलीट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Google Play स्टोरवर सध्या मालवेअर असलेले अ‍ॅप्स आहेत. एका वृत्तानुसार गुगलने पुन्हा एकदा असे 24 अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून हटवले आहेत. हे अ‍ॅप मालवेअर असणारे होते आणि यूजरचा हा डाटा चीनी सर्वरवर पाठवला जात होता. असे सांगण्यात येत आहे की हे अ‍ॅप चीनी डेवलपरकडून गुगल प्ले स्टोअरवर अपलोड करण्यात आले होते.

VPN Pro ब्लॉगपोस्टनुसार Shenzhen HAWK नावाची एक चीनी कंपनी आहे. ही कंनपी TCL Corporation ची सबसिडरी सांगितली जाते. या कंपनीचे गुगल प्ले स्टोअरवर 24 अ‍ॅप्स होते.

आता पर्यंत या अ‍ॅपचे 382 मिलियन डाऊनलोडर आहेत. हे अ‍ॅप यूजर्सची संवेदनशील माहिती मागत होते आणि यातील काही मालवेअर देखील होते. असे अ‍ॅप शक्यतो यूजर्स सहज डाऊनलोड करतात. वेदर फोरकास्ट अ‍ॅपचे 10 मिलियनपेक्षा जास्त डाऊनलोडर आहेत. याशिवाय सुपर क्लीनरचे 100 मिलियन डाऊनलोडर आहेत.

VPN Pro ब्लॉगपोस्टनुसार जेव्हा गुगलला अशी माहिती विचारली तेव्हा काही काळासाठी कंपनीने या अ‍ॅप्स ला गुगल प्ले स्टोअरवरुन काढले होते. एका स्टेटमेंटमध्ये गुगलने सांगितले की आम्ही सिक्युरिटी आणि प्रायवेसी वॉयलेशनच्या संबंधित केलेले रिपोर्ट्स गांभीर्याने घेतो. जर आम्हाला पॉलिसीचे उल्लंघन करणारे अ‍ॅप आढळले तर आम्ही ते तात्काळ प्ले स्टोरवरुन हटवून टाकतो. ही आहे त्या अ‍ॅपची लिस्ट, जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे अ‍ॅप असतील तर ते तात्काळ डिलिट करा.

1. World Zoo
2. Puzzle Box
3. Word Crossy!
4. Soccer Pinball
5. Dig it
6. Laser Break
7. Word Crush
8. Music Roam
9. File Manager
10. Sound Recorder
11. Joy Launcher
12. Turbo Browser
13. Weather Forecast
14. Calendar Lite
15. Candy Selfie Camera
16. Private Browser
17. Super Cleaner
18. Super Battery
19. Virus Cleaner 2019
20. Hi Security 2019
21. Hi VPN, Free VPN
22. Hi VPN Pro
23. Net Master
24. Candy Gallery