Google वर 5000% जास्त सर्च केला गेला ‘हा’ शब्द ! नेमकं काय आहे ते जे संपुर्ण जगाला जाणून घ्यायचंय?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Google | जेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल जाणून घ्यायची इच्छा असते तेव्हा तुम्ही ताबडतोब Google ची मदत घेता. अनेकदा लोक इतक्या वेळा एखादी गोष्ट सर्च करतात की, जी गुगल सर्चमध्ये टॉप लिस्टमध्ये येते. ‘इयर इन सर्च’ रिपोर्टमधून समजले आहे की, कोरोना महामारीदरम्यान जगभरात कोरोना व्हायरस सर्च लिस्टमध्ये सर्वात वर होता. अचानक एखाद्या शब्दाच्या सर्चमध्ये 5000% जास्त तेजी दिसून आली तर समजले पाहिजे की, आवश्य काहीतरी खास आहे. अखेर ते काय आहे जे संपूर्ण जगाला जाणून घ्यायचे आहे.

देश-विदेशात स्टॉक मार्केटच्या वाढत्या व्यवहारांसोबतच लोकांमध्ये सुद्धा याची उत्सुकता निर्माण झाली आहे. 2020 मध्ये जागतिक लॉकडाऊनदरम्यान Google वर काही ट्रेडिंग शब्दांमध्ये ‘FAANG स्टॉक’ शब्दात ब्रेकआऊट दिसून आला.

Google नुसार, ब्रेकआऊटचा अर्थ आहे की एखादा शब्द सर्च करण्यात 5,000 टक्केपेक्षा जास्त वाढ होणे. FAANG ची लोकप्रियता इतकी जास्त होती की, जगभरातील लोक विशेषता आशियातील लोक यात जास्त पुढे होते. FAANG अमेरिकेत सर्वात मोठ्या यादीबद्ध कंपन्यांनी मिळवून बनले आहे आणि गुंतवणुकदारांच्या आवडीच्या बाबतीत सुद्धा सर्वात लोकप्रिय आहे.

काय आहे FAANG

मागील काही काळापासून FAANG stocks खुप लोकप्रिय झाला आहे आणि तो सर्वांच्या पसंतीचा आहे. FAANG stocks चा वापर पाच सर्वात महत्वाच्या आणि प्रमुख कंपन्यांचे शेयर व्याख्याकृत करण्यासाठी केले गेले आहे.

F – Facebook (फेसबुक)

A – Amazon (अमेझॉन)

A – Apple (अ‍ॅप्पल)

N – Netflix (नेटफ्लिक्स)

G – Google (ज्यास आता Alphabet Inc. च्या नावाने ओळखले जाते)

FAANG शब्दाचा वापर पहिल्यांदा 2013 मध्ये मेड मनी जिम क्रेमर ने CNBC वर आपल्या कार्यक्रमात केला होता. क्रेमरने सुरूवातीला FANG शब्द वापरला होता. त्यानंतर जसजशी Apple ची लोकप्रियता वाढली यामध्ये आणखी एक ‘ A ’ जोडला गेला आणि हे FANG वरून FAANG झाले.

का सर्वात जास्त सर्च झाला FAANG

मागच्या वर्षी महामारीदरम्यान लागलेल्या लॉकडाऊनमध्ये लोक काम आणि मनोरंजन दोन्हीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अवलंबून होते, त्यावेळी या प्लॅटफॉर्मच्या लोकप्रियतेच्या वेगात उसळी आली. अमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मची मागणी वाढली. लोक गुगल आणि फेसबुकवर सुद्धा जास्तीत जास्त वेळ घालवत होते. यामुळे या शेयरमध्ये मोठी तेजी आली आणि गुंतवणुकदारांच्या संख्येने या कंपन्यांचे शेयर खरेदी करण्यास सुरूवात केली.

जाणून घ्या भारतात किती लोकप्रिय झाले FAANG?

या कंपन्यांची वाढती लोकप्रियता त्या वेळी झाली जेव्हा बहुतांश भारतीय ब्रोकिंग फर्मने परदेशी सुविधा देण्यास सुरूवात केली होती. थेट शब्दात सांगायचे तर भारतीय गुंतवणुकदार ज्यांचे कोणत्याही ट्रेंडिंग कंपनीसोबत टेडिंग खाते होते, ते अमेरिकन बाजारात लिस्टेड शेयर खरेदी करू शकत होते, ज्यामध्ये FAANG चा सुद्धा समावेश होता

Web Title : google search queries particular term rose by more than 5000 percent faang stocks know what

Pune Bhusar Market | पुण्याच्या भुसार बाजारात आता 5 ठिकाणी ‘पे अँड पार्क’

Lalbaugcha Raja  | गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट!
भक्तांनी लालबागच्या राजाचे दर्शन आणि पूजा ऑनलाइन करण्याचे आवाहन

Pregnancy | प्रेग्नंसीत ‘हे’ पदार्थ खाल्ल्याने मुल गोरे होते का? या काळात सेक्स करावा का?
जाणून घ्या काय म्हणतात एक्सपर्ट

Paytm सारख्या वॉलेटमधून सुद्धा खरेदी करू शकता ‘इश्यू’,
SEBI ने दिली परवानगी