गुगलची ‘ही’ लोकप्रिय सेवा लवकरच बंद होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०१२ मध्ये गुगलने सुरु केलेली ‘गूगल प्ले आर्टिस्ट हब’ ही सुविधा ३० एप्रिल नंतर बंद होणार आहे. या सुविधेद्वारे छोट्या कलाकारानी तयार केलेली गाणी, व्हिडिओ अपलोड करता येतात व ज्यांना अशी गाणी ऐकायची आहेत त्यांना हे अँप्लिकेशन डाउनलोड करून ऐकता येत होती.

ही सुविधा फोने मध्ये इंटनेट नसले तरी वापरता येते. परंतु ३० एप्रिल नंतर ही सेवा बंद होणार असल्याने चाहत्यांमध्ये नाराजी निर्माण होणार आहे. ज्या कलाकारांणी आपली गाणी अपलोड केली आहेत. त्यांचा फायनल रिपोर्ट आणि पैसे लवकरच देण्यात येतील. तसेच १ जुलै नंतर हे अँप्लिकेशन प्ले स्टोर वरून हटवले जाईल.

यापूर्वीच गुगलने गूगल, इनबॉक्स, अशा सुविधा बंद केल्या आहेत. गुगल, युटूब म्युझीक ही सेवा अधिक प्रभावी देण्यासाठी गूगल प्ले आर्टिस्ट हब ही सेवा बंद करणार आहे. दरम्यान, गुगल आपल्या ग्राहकांसाठी कोणती नवीन सेवा देतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.