गुगलने अँड्रॉईड स्मार्टफोनवर चालणारं Google Snapshot हे लोकप्रिय फीचर बंद केलं, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगलच्या वतीने (Google) युजर्सना अनेक सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी नवनवीन फीचर्स रोलआउट (Features Rollout) केले जाते. तर अनेकवेळा उपयोगी नसलेली फीचर बंद केली जातात. गुगलने असेच एक लोकप्रिय फिचर बंद केले आहे. हे फिचर 2018 मध्ये लाँच करण्यात आले होते. Google Snapshot असे या फीचरचे नाव असून आता हे फीचर युजर्सला (Users) वापरता येणार नाही. ते अँड्रॉईड स्मार्टफोनमधून (Android Smartphone) हटवण्यात आले आहे.

 

9 to 5 Google रिपोर्टनुसार, गुगलने Google Snapshot हे फीचर रिमूव्ह (Feature Remove) केले आहे. अँड्रॉईड स्मार्टफोनवर चालणारं हे फीचर अतिशय कामाचं होतं. मात्र, खूपच कमी लोकांना या फीचर बाबत माहिती होती. हे फीचर Google Assistant स्क्रीनवर (Screen) इनबॉक्स प्रमाणे (Inbox) दिसत होते. यावर क्लिक केल्यानंतर युजर्सला त्यांची सध्याची सर्व माहिती सजह मिळत होती. अपॉइंटमेंट (Appointments), वेदर फोरकास्ट (Weather Forecasts), ट्रॅफिक (Traffic) आणि रिमांडर (Reminder) इत्यादी सारखे डिटेल्स एका क्लिकवर मिळत होते.

 

Google Snapshot हे फीचर लहान पण अतिशय कामाचे होते. अनेक अँड्रॉईड युजर्सला यासंदर्भात माहिती नव्हती.
या वर्षाच्या सुरुवातीला गुगलने आपल्या अ‍ॅपवर दिलेल्या एका नोटिसमध्ये Google Snapshot फीचर लवकरच बंद केले जाणार असल्याची माहिती दिली होती.
मात्र, हे फीचर कधी बंद करणार याची तारीख दिलेली नव्हती. आता हे फीचर गूगलने अँड्रॉइड स्मार्टफोन मधून हटवलं आहे.
हे फिचर गुगलच्या डिसकव्हर पेजवर (Discover Page) दिले जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे.

 

Web Title :- Google Snapshot | google snapshot feature discontinued

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा