Google चे नवीन फिचर आले भारतात, ड्रायव्हिंग करताना कॉल-मेसेज करणे होईल सोपे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – गाडी चालवताना कुणाला मेसेज किंवा कॉल करणे खुप धोकादायक असते. मात्र, जगभरात असंख्य लोक असे करतात आणि स्वतासह दुसर्‍यांचा जीवसुद्धा धोक्यात घालतात. गुगल आता एक फिचर घेऊन आले आहे ज्याद्वारे यूजरसाठी कार चालवताना कॉल रिसीव्ह करणे आणि मेसेज रिप्लाय करणे थोड सोपे होईल.

गुगलच्या सपोर्ट पेजनुसार, भारतात अँड्रॉईड यूजर्ससाठी गुगल मॅप्समध्ये गुगल असिस्टंट ड्रायव्हिंग मोडसुद्धा जारी केला जात आहे. हे फिचर अगोदर केवळ युएससाठी उपलब्ध होते. आता ते सिंगापुर, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि भारतासारख्या काही देशात उपलब्ध करून दिले जाणार आहे.

गुगलने सपोर्ट पेजवर लिहिले आहे की, यूजर्स व्हॉईसचा वापर करून कॉल आणि टेक्स्ट सेंड आणि रिसिव्ह करू शकतील. सोबतच यूजर्स नवीन मेसेजला क्विक पद्धतीने रिव्ह्यू सुद्धा करू शकतील. गुगलने म्हटले की, ड्रायव्हिंग मोडद्वारे यूजर्सला सुविधा मिळेल की, ते नॅविगेशन स्क्रीन न सोडता हे सर्व करू शकतील.

गुगल असिस्टंट यूजर्सला नवीन मेसेज वाचवून दाखवेल, जेणेकरून त्यांचे लक्ष रस्त्यावरून हटणार नाही आणि त्यांना फोन पहावा लागणार नाही, अँड्रॉईड यूजर्सला इन्कमिंग कॉल्ससाठी अ‍ॅलर्टसुद्धा मिळेल आणि या कॉल्सला यूजर्स व्हॉईस कमांडद्वारे कट किंवा रिसिव्ह करू शकतील.

ड्रायव्हिंग मोडचा वापर असा करा :
गुगलचे म्हणणे आहे की, ड्रायविंग मोडचा वापर करणे खुप सोपे आहे. यूजर्सला केवळ गुगल मॅप्स ओपन करून एखाद्या डेस्टिनेशनसाठी नेव्हिगेशन ऑन करावे लागेल. नंतर स्क्रिनवर ड्रायव्हिंग मोडचा पॉप दिसेल त्यावर टॅप करावे लागेल. याची आणखी एक पद्धत सुद्धा आहे.

यासाठी यूजर्सला आपल्या अँड्रॉईड फोन्समध्ये असिस्टंट सेटिंगमध्ये जावे लागेल किंवा ’हे गुगल, ओपन असिस्टंट सेटिंग्स’ म्हणावे लागेल. यानंतर ’ट्रान्सपोर्टेशन’ मध्ये जाऊन ड्रायव्हिंग मोड सिलेक्ट करून ऑन करावा लागेल. हे फिचर सध्या केवळ 4जीबी रॅमसह व्हर्जन 9.0 किंवा यावरील अँड्रॉईड फोन्ससाठी उपलब्ध आहे.