Google नं क्रोम अ‍ॅप्सला ‘सपोर्ट’ बंद करण्याची केली घोषणा, ‘ही’ आहे टाईमलाइन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Google क्रोम अ‍ॅपला बंद केले जाणार आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, हे अ‍ॅप सगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करणे बंद करणार आहे. आता गुगल क्रोमद्वारे वेब स्टोअरवर नवीन सबमिशन देखील घेतले जाणार नाही. याचा अर्थ असा नाही की हे सर्व आतापासूनच बंद होणार आहे.

मार्च 2020 पासून कंपनी याबाबतची पावले उचलायला सुरुवात करणार आहे. त्यानंतर सबमिशन बंद केले जाईल. सबमिशन बंद केल्यानंतर डेव्हलपर्स या प्लॅटफॉर्मवर नवीन अ‍ॅप आणू शकणार नाही. मात्र चांगली गोष्ट ही आहे की डेव्हलपर्स जुन्या अ‍ॅपमध्ये 2022 पर्यंत अपडेट देऊ शकणार आहेत.

जून 2022 पासून गुगल क्रोम अ‍ॅप्स काम करणार नाही. क्रोम अ‍ॅप्स हे वेब बेस अ‍ॅप्स आहेत. ज्यांना तुम्ही क्रोम मध्ये इंस्टाॅल करू शकता. गूगलच्या मते, क्रोम अ‍ॅप्सला वेब अ‍ॅप्स ने रिप्लेस केले जाईल.

गुगलच्या म्हणण्यानुसार Windows, Mac आणि Linux सारख्या सर्वांशी जून 2020 पासून काॅन्टॅक्ट बंद केला जाईल. मात्र, शैक्षणिक आणि एंटरप्राइजेस ग्राहकांसाठी, डिसेंबर 2020 पर्यंत त्याचा सपोर्ट सुरु असेल.

गुगल क्रोमचे अ‍ॅप लोक जास्त वापरात नाहीत. गुगलचे स्वतःचे एक स्टोर आहे ज्याठिकाणी हे उपलब्ध आहेत. गूगल क्रोम मध्ये एक्स्टेंशन्स देखील होते जे गुगल क्रोम अ‍ॅप्स प्रमाणेच असतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like