काय सांगता ! होय, Google मध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ करणार्‍यांची ‘चांदी’, मिळणार तब्बल 75 हजारांचा भत्ता

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना संसर्गामुळे जगभरातील सर्वच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. फेसबुकने तर निम्म्या कर्मचाऱ्यांना पुढील १० वर्ष घरातूनच काम करण्याची ऑफर देऊ केली आहे. आता Googel ने देखील त्यांचे ऑफिस ६ जुलै पासून टप्प्या-टप्प्याने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जगभरातील त्यांचे अनेक कर्मचारी वर्क फॉर होम करत आहे. या कर्मचाऱ्यांना गुगलने १००० डॉलर अर्थात भारतीय चलनाप्रमाणे साधारण ७५ हजार रुपयांचा भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. वर्क फॉर होमच्या वेळी कर्मचाऱ्यांनी ज्या आवश्यक उपकरणांसाठी खर्च केला, त्यासाठी ही रक्कम देण्यात येणार असल्याचं अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं.

सुंदर पिचाई म्हणाले, ६ जुलै पासून जगभरातील अनेक शहरामध्ये गुगलचे नवीन ऑफिसेस उघडण्यास सुरुवात करण्यास येणार आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्याची इच्छा आहे त्यांना रोटेशन बेसिसवर काम करण्याची संधी मिळेल. तसेच ‘परिस्थिती पाहून गुगल सप्टेंबर पर्यंत रोटेशन प्रोग्रामचे प्रमाण वाढवून त्याची क्षमता ३० टक्के करेल. कारण आमची अशी अपेक्षा आहे की, सर्वाधिक गुगलर्स यावर्षी वर्क फ्रॉम होमचं सुरु ठेवतील. म्हणून ऑफिसच्या कामासाठी लागणारी उपकरणं आणि फर्निचरसाठी आम्ही त्यांना १००० डॉलर किंवा त्या देशाच्या चलनानुसार तेवढीच रक्कम देणार आहोत, अशी घोषणा पिचाई यांनी केली.

तसेच, गुगलच्या कोणत्याही ऑफिसमधील कर्मचाऱ्यास ऑफिसमधून काम करण्याची आवश्यकता वाटत असेल तर त्याबाबत तुमचा मॅनेजर तुम्हास १० जून पर्यंत माहिती देईल. बाकी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्येच येऊन काम करणे ऐच्छिक असेल, असं देखील सुंदर पिचाई यांनी म्हटलं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like