Google पुढील वर्षापर्यंत गूगल Hangouts करणार बंद, डेटा करणार इथं ट्रान्सफर

नवी दिल्ली : गुगलने अगोदरच घोषणा केली आहे की, ते हँगआऊट पुढील वर्षी बंद करणार आहेत आणि त्यास गुगल चॅटमध्ये शिफ्ट करणार आहे. गुगलने एका अधिकृत घोषणेत म्हटले की, 2021च्या पहिल्या सहामाहीत गुगल हॅगआऊट बंद केले जाईल. गुगलचे म्हणणे आहे की, हँगआऊट यूजरना गुगल चॅटमध्ये कोणत्याही शुल्काशिवाय ट्रान्सफर करण्यात येईल. यूजरला चॅट हिस्ट्री आणि कॉन्टॅक्ट नव्या चॅट प्लॅटफॉर्मवर सहज ट्रान्सफर करता येईल. याचा अर्थ गुगल हँगआऊट गुगल चॅटमध्ये बदलेल.

मिळणार ही सुविधा
सध्या या बदलात लागणार्‍या वेळेबाबत स्थिती स्पष्ट नाही. यापूर्वी गुगलने हँगआऊटला चॅट किंवा गुगल मीटसोबत मर्ज करण्याची सूचना सुद्धा दिली होती. गुगलने आपल्या वक्तव्यात आपल्या स्टँडअलोन अ‍ॅप आणण्याशिवाय वेब क्लाईंट आणि जीमेल अ‍ॅपसाठी डेडिकेटेड सेक्शन आणण्याबात म्हटले होते. गुगल वर्कस्पेसच्या यूजरसाठी चॅट सध्या जीमेलवर उपलब्ध आहे. गुगलचे म्हणणे आहे की, हँगआऊट यूजर्सना चॅट अ‍ॅपमध्ये इनबॉक्स, फास्टर सर्च, इमोजी इत्यादी फीचर मिळतील. गुगल हँगआऊटशी जोडलेल्या एफआय गुगलचे मॅसेज वापरण्यासाठी उपलब्ध असेल.

एफआयच्या यूजर्सला व्हॉइस कॉल आणि व्हॉइस मॅसेज चेक करण्याचे ऑपशन मिळेल, ज्याद्वारे डिव्हाइसमध्ये मॅसेजवर चर्चा मॅनेज करता येईल. हा बदल याच महिन्यात दिसून येईल. अशाच प्रकारे गुगल व्हॉइस वापरणारे यूजर स्टँडअलोनचा वापर करू शकतील. या व्हॉईस अ‍ॅपवर फ्री कॉलिंगचा लाभ घेता येईल.

गुगलने हँगआऊटच्या बाहेर येण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी प्लॅटफॉर्मवर असलेल्या सेवासुद्धा यावर्षी बंद होतील. फोन्स कॉल फिचर या महिन्यापासून युरोपियन संघ आणि युनायटेड स्टेटसमध्ये बंद होईल. हे नवीन टेलीकम्यूनिकेशन रेग्युलेशनमुळे होत आहे, असे म्हटले जात आहे.