गुगल सुरु करतंय TikTok ला ‘टक्कर’ देण्यासाठी ‘हे’ अ‍ॅप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टिकटॉकची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. टिकटॉक हे प्रसिद्धी मिळवून देणारे माध्यम ठरत असल्यामुळे दिवसेंदिवस टिकटॉकचे वापरकर्ते वाढत आहेत. आता टिकटॉकला प्रतिस्पर्धी म्हणून गुगल आपले असेच एक अ‍ॅप लॉंच करणार आहे.

गुगल अमेरिकेतील लोकप्रिय सोशल व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप ‘फायरवर्क’ खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच गुगलबरोबरच चीनची मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट सुद्धा फायरवर्क खरेदी करण्याच्या विचारात आहेत. मात्र, फायरवर्क खरेदी करण्याच्या शर्यतीत गुगल इतर कंपन्यांच्या पुढे आहे. फायरवर्क ने कमी कालावधीत जास्त युजर्स भारतामध्ये मिळवलेले आहेत. फायरवर्कला या वर्षाच्या सुरूवातीला १०० मिलियन डॉलर नफा प्राप्त झाला आहे. तर, टिकटॉकची सहयोगी कंपनी बाइटडान्सनं ७५ मिलियन डॉलर आहे.

टिकटॉक पेक्षा काय आहे वेगळे फायरवर्कचे फिचर
फायरवर्क युजर्स ३० सेकंदाचा व्हिडिओ बनवू शकतो, टिकटॉकमध्ये फक्त १५ सेकंदापर्यंत व्हिडिओ बनवता येऊ शकतो. युजर्स व्हर्टिकल व्हिडिओसोबतच हॉरिजॉन्टल व्हिडिओसुद्धा शूट करू शकतो.
फायरवर्क अ‍ॅप अँड्रोइड आणि आयओएस युजर्ससाठी उपलब्ध आहे. हे अ‍ॅप वापरणाऱ्या युजर्सची संख्या १०लाखांपेक्षा अधिक आहे.

फेसबुकचंही व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप
मागच्य वर्षी नोव्हेंबर महिन्यात lasso नावाचं एक अ‍ॅप फेसबुकनं लाँच केले आहे. फेसबुकचं हे लेटेस्ट अ‍ॅप सध्यातरी फक्त अमेरिकेतच उपलब्ध आहे. टिकटॉकसारखेच या अ‍ॅपचेदेखील फिचर आहेत.

टिकटॉकचा होतोय गैरवापर
भारतात टिकटॉकची क्रेझ इतकी वाढत चालली आहे की फॉलोअर्स मिळवण्यासाठी लोक वाट्टेल त्या थराला जात आहेत. टिक टॉक अ‍ॅपमध्ये अश्लिल मजकूर अपलोड करण्यात येत असल्याने या अ‍ॅपवर तात्काळ बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली होती. टिक टॉकचे १२ कोटी यूजर्स असून बंदीनंतर या अ‍ॅपवरील सुमारे ६० लाख व्हिडिओ डिलिट करण्यात आले होते. नंतर न्यायालयाने देखील बंदीवरील निर्णय मागे घेतला होता. अनेक लोकांनी टिकटॉकला मोठे उत्पन्नाचे साधन बनवले आहे.

Visit : Policenama.com