बातम्यांसाठी आता Google कडून प्रसारमाध्यमांना देण्यात येणार 1 अब्ज डॉलर, जाणून घ्या

ब्रुसेल्स : वृत्तसंस्था – गुगलच्या न्युज ॲपवर बातम्या देण्याकरिता निवडक माध्यम समूहांना गुगल कंपनीकडून येत्या ३ वर्षात १ अब्ज डॉलरचा मोबादला देण्यात येणार आहे. प्रसारमाध्यमांकडून प्रसारित केलेल्या माहितीचा गेली अनेक वर्ष गुगल सर्च इंजिनकडून अवैधरित्या उपयोग करण्यात आला असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे गुगलकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांकडून देण्यात आलेल्या बातम्यांचे ब्लर्ब गुगलच्या न्युज ॲप मध्ये दिसतील तसेच जे लेख वाचायला पैसे भरावे लागत होते ते आता फ्री मध्ये वाचायला मिळतील.

या सगळ्यसाठी गुगलकडून निवडक प्रसारमाध्यमाना मोबदला देण्यात येणार आहे. गुगलकडून या नव्या सेवेचा प्रारंभ गुरुवारी ब्राझील आणि जर्मनीमध्ये करण्यात आला. गुगल न्युज ॲपमध्ये एखाद्या विषयाची माहिती तसेच त्या संबधी लेख किंवा न्युज, त्या विषयाशी संबधीत माहिती सगळी एकाच ठिकाणी वाचकांना उप्लबध होणार आहे. तसेच ती बातमी ज्या वेबसाईट वरून देण्यात आली त्या साईटवर सुद्धा जाता येईल. यामुळे बातमी वाचणाऱ्याला बातमीसंबधी सगळी माहिती एकाच ठिकाणी भेटेल.

कोणकोणत्या कंपनीशी करार करणार
गूगलचे उपाध्यक्ष ब्रॅड बेंडर यांनी सांगितले कि, गूगलच्या न्यूज शोकेस प्रोग्रॅमसाठी ब्राझील, अर्जेंटिना, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन आदी देशांमधून २०० प्रसारमाध्यम समूहांकडून गुगल सोबत करार करण्यात आला. बातम्यांचे जाळे जसे वाढत जाईल तसे गुगल अजून प्रसार माध्यमांशी करार करेल.