WhatsApp ला Google देणार टक्कर, आणले ‘हे’ जबरदस्त चॅटिंग App, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातील इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp चा सर्वाधिक वापर केला जातो. दरम्यान नव्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार व्हॉट्सअ‍ॅपच्या वादामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. अशातच काही अन्य इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म सारखे Telegram ही आले आहे. मात्र, टेलिग्रामला व्हॉट्सअ‍ॅपकडून कोणतेही यश मिळाले नाही. पण आता गुगलकडून व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलीग्रामला टक्कर देण्यासाठी Gmail अ‍ॅपमध्ये एक शानदार फिचर दिले आहे.

म्हणजे जीमेल अ‍ॅन्ड्रॉइड आणि iOS डिवाईसमध्ये Google Chat App इंटिग्रेट करण्यात येणार आहे. गुगल चॅट अ‍ॅपच्या माध्यमातून युजर्सला आता मेलसह व्हिडीओ कॉन्फ्रेसिंगसाठी Meet, Room चा सपोर्ट दिला जाणार आहे. ज्यात पर्सनल अकाउंटसाठी उपलब्ध केले जाणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर युजर्सला आता अ‍ॅपच्या खाली चार टॅब मिळणार आहेत. नवे चॅटिंग फिचर रोलाउट केल्यानंतर गुगलकडून Hangouts अ‍ॅप बंद केले जाऊ शकते. आता पर्यंत जीमेल युजर्स हँगआउटच्या माध्यमातून चॅटिंग करु शकत होते.

या पद्धतीचा कसा वापर करायचा

– गुगलच्या नवीन चॅटिंग फीचरचा वापर करण्यासाठी युजर्संना सर्वात आधी जीमेल अ‍ॅप अपडेट करावे लागेल.
– यासाठी अँड्रॉइड युजरला Google Play Store आणि iOS यूजर्सला Apple App स्टोरवर जावे लागेल.
– अ‍ॅप अपडेट झाल्यानंतर युजर्संना जीमेल ओपन कारावा लागेल. या ठिकाणी तुम्हाला टॉप लेफ्ट स्क्रीन व सॅडविच बटनवर क्लिक करावे लागेल. यावरून साउंड बार ऑप्शन ओपन होईल.
– यानंतर स्क्रॉल डाऊन करुन सेटिंग ऑप्शनमध्ये जावे
– आता पर्सनल अकाउंट निवडावे लागणार आहे.
– येथे तुम्हाला Chat ऑप्शन दिसणार आहे. ते अनेबल करता येणार आहे.
– आता जीमेल अ‍ॅप रिस्टार्ट करा
– जीमेल अ‍ॅपच्या खाली चॅटिंगमध्ये ऑप्शन दिसणार असून युजर्सला अगदी सहज चॅटिंग करता येणार आहे.