आता गुगल देणार थेट उत्तर 

वृत्तसंस्था : माहिती देण्यासाठी कोणी उपलब्ध होत नसेल तर गुगल सर्च करून ती माहिती मिळवली जाते. गुगलवर सर्च केल्यावर आपण टाकलेली लिंक व तिच्याशी रिलेटेड वेगवेगळ्या वेबलिंक दिसत होत्या. आता मात्र  यापुढे तुमच्या मोबाइलवर गुगलचे सर्च इंजिन अशा वेबलिंक दाखवणार नाही. कारण इंटरनेटवर शोध घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जाएंट सर्च इंजिन गुगलमध्ये मोठा बदल करता येणार आहे.

गुगल लवकरच आपले नवीन फिचर लाँच करणार आहे. यामुळे सर्च करणाऱ्याला एकच आणि अचूक उत्तर मिळेल. त्याला सर्चमध्ये इतर वेबलिंक दिसणार नाही. पण त्या पेजवर खालच्या बाजूला ‘शो ऑल रिझल्ट’ हा पर्याय सर्च इंजिन कायम ठेवणार आहे. यामुळे नवी फिचर आल्यावरही गुगलेने ‘शो ऑल रिझल्ट’द्वारे युजर्सना दिलासा दिला आहे.

गुगल लवकरच हे नवीन फिचर लाँच करणार आहे. कॅल्क्युलेटर, स्थानिक वेळ आणि युनिट कन्व्हर्टर या गोष्टींवर प्रयोग केल्यानंतर सर्च इंजिनचा वेग वाढवण्यात आला आहे. अनेक जण गुगलवर सर्च करताना ‘फुल सर्च रिझल्ट’ या पर्यायाचा वापर करत नाही. पण ‘शो ऑल रिझल्ट’ करणाऱ्यांना मात्र ‘फुल सर्च रिझल्ट’ करण्याची गरज नाही, असं गुगल सर्चचे एग्झिक्युटिव्ह डॅनी सुलिवन यांनी सांगितलं. सर्च इंजिनद्वारे आतापर्यंत आम्हाला भरपूर प्रतिसाद आणि माहिती मिळाली आहे.  आता त्यात सुधारणा कशी आणि कधी करायची यावर टीम काम करत असल्याचं ते म्हणाले.

नवीन फिचर लाँच झाल्यावर गुगलचे सर्च इंजिन वेळ, कॅल्क्युलेशन आणि कन्व्हर्जनसाठी एकच उत्तर देईल. या फिचरवर फेब्रुवारीत पहिली चाचणी घेण्यात आली होती. पण युजर्सच्या तक्रारीनंतर ही चाचणी थांबवण्यात आली होती. गुगलने या टुलवर आता शिक्कामोर्तब केले आहे. ‘फेब्रुवारीत केलेल्या प्रयोगात आम्ही जाहिराती हटवण्यासह अचूक सर्चवर भर दिला. तसंच आणखी रिझल्ट पाहण्यासाठी युजर्सना आम्ही पर्यायही देत आहोत. यामुळे हे फिचर लवकरच मोबाइल, वेब आणि गुगल सर्च अॅप अँड्रॉइड आणि आयओएसवर दिसेल, अशी माहिती गुगलने दिली आहे.