‘या’ कंपनीचे कर्मचारी सप्टेंबर 2021 पर्यंत करणार work from home

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जगभरातील करोना पुन्हा डोके वर काढत आहे. त्यामुळे टेक्नोलॉजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलने वर्क फ्रॉम होमचा कालावधी सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे गुगलचे जवळपास 2,00,000 कर्मचारी आता सप्टेंबर 2021 पर्यंत आपल्या घरून काम करू शकणार आहेत. यानंतर ऑफिस उघडल्यानंतर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून केवळ तीन दिवस कार्यालयात यावे लागणार आहे. बाकीची तीन दिवस पुन्हा वर्क फ्रॉमची सुविधा दिली आहे.

रिपोर्टच्या माहितीनुसार, अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवला आहे. त्यात म्हटले आहे की, कंपनी फुल हायब्रिड वर्क फोर्स मॉडलचा अवलंब करीत आहे. यासाठी प्रयोग केले जात आहे. कारण, प्रोडक्टिविटीवरून कोणतीही समस्या उद्धवू नये. गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना 2021 च्या दुसऱ्या सहामाही मध्ये करोना लस सुद्धा देणार आहे.

ट्विटरचे कर्मचारी निवृत्तीपर्यंत करू शकतील घरून काम

या वर्षीच्या मे महिन्यात गुगलने म्हटले होते की, त्यांचे 2 लाख कर्मचारी घरून काम करू शकतात. त्यांना ऑफिसमध्ये बोलावण्यासाठी दबाव टाकला जाणार नाही. तर ट्विटरने म्हटले की, त्यांचे कर्मचारी रिटारयरमेंट पर्यंत घरून काम करू शकतील. फेसबुककडून रिमोट वर्क प्लान लागू केला आहे. फेसबुकचे जवळपास अर्धे कर्मचारी 2030 पर्यंत घरून काम करू शकतील.