जीओला तोडीस तोड… गुगलचा धमाकेदार स्वस्त 4G फोन लाँच 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जगभरातील टॉपमोस्ट कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगल ने भारतीयांकरिता ४जी सेवा देणारा अवघ्या ५०० मिळणारा मोबाईल लाँच केले आहे. भारतातील दूरसंचार कंपन्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या जिओ ला तोडीस तोड असा मोबईल गुगल ने आणला आहे.  WizPhone WP006 असे या फोनचे नाव आहे. या फोन बाबतची विशेष बाब अशी की हा फोन जिओ च्या फोन सारखाच दिसतो. या फोनमध्ये गुगलने गुगल असिस्टंटही दिले आहे.

असा आहे गुगलचा नवा धमाकेदार फोन

— या फोनमधील फिचरवर नजर फिरविल्यास यामध्ये २. ४  इंचाचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे.

— याशिवाय या फोनमध्ये ४ जीबी इंटरनल स्टोरेज आणि ५१२ एमबीची रॅम देण्यात आली आहे.
— हा फोन JioPhone सारखाच KaiOS वर चालतो.
— या फोनमध्ये १८०० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.
— पाठीमागे २ मेगापिक्सलचा कॅमेरा
— तर पुढे VGA कॅमेरा देण्यात आला आहे.
— सध्या हा फोन इंडोनेशियामध्ये उपलब्ध असून त्याची किंमत IDR ९९,००० (४९० रुपये) एवढी आहे.
हा फोन भारतातही लवकरच लाँच केला जाण्याची शक्यता आहे. WizPhone WP006 हा फोन सिंगल सिमला सपोर्ट करतो.  SPRD 9820A/QC8905 हा ड्युअल कोअर प्रोसेसर देण्य़ात आला आहे. ग्राफिक्ससाठी माली-४०० जीपीयू देण्यात आला आहे. मेमरी १२८ जीबी पर्यंत वाढविली जाऊ शकते.