तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त करणारा तडीपार गुंड अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट ३ च्या पोलिसांनी एका तडीपार गुन्हेगाराला अटक केली आहे. समीर अशोक ढोकळे असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने ढोकळे याला सुतारदरा येथे सापळा रचून अटक केली. सोनल संदीप तुपे (वय-२३) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. हा प्रकार ७ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आला होता.

लाईट बील भरण्याच्या कारणावरून तरूणीचा मानसीक आणि शारिरीक छळ केला. त्यामुळे तरुणीने अंगावर डिझेल पेटवून घेतले. यामध्ये गंभीर जखमी होऊन तरुणीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोथरुड पोलिसांनी मिरा नवनाथ तुपे, सुरज अशोक ढोकळे व समीर अशोक ढोकळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून समीर ढोकळे फरार होता.

आरोपी समीर ढोकळे याच्यावर गंभीर दुखापत व दुखापतीचे तीन व बेकायदेशीर जमाव जमवुन दंगा मारामारी करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे असे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला डिसेंबर २०१८ मध्ये पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. तडीपार असताना देखील त्याने शहरात येऊन तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला कोथरूड पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उप निरीक्षक संजय गाडकवाड, राजकुमार केंद्रे, किरण अडागळे पोलीस कर्मचारी किशोर शिंदे, दत्तात्रय गरुड, रामदास गोणते, मच्छिंद्र वाळके, राहुल घाडगे, महेबुब मोकाशी, गजानन गानबोटे, संदीप राठोड यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’