इंदापूर काॅलेजमध्ये विद्यार्थ्याच्या डोक्यात फरशी मारून जीवे मारण्याचा गावगुंडाचा प्रयत्न

इंदापुर आय काॅलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण 

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन

इंदापूर येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दाखला काढण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याला काॅलेज आवारात घुसुन दोन नामचीन गुंडानी दहशत निर्माण करून बेदम मारहाण केली व डोक्यात फरशिचा दगड मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्यांचे विरूध्द इंदापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आसुन पोलिसांनी तात्काळ गुंडाच्या मुसक्या आवळुन त्यांना जेरबंद केले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f4c786e7-cb71-11e8-a6d0-4d65960d98df’]

याबाबत लखन रमेश दोरकर.( वय.वर्षे. १९.) रा. वकीलवस्ती, ता. इंदापूर, जि. पूणे. या काॅलेज विद्यार्थ्याने इंदापूर पोलिस स्टेशनला लेखी फिर्याद दाखल केली आसुन त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे.

[amazon_link asins=’B008MWO36A’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9a65c0f6-cb72-11e8-9236-631f43e795e7′]

रमेश दोरकर याने  फिर्यादीत म्हटले आहे की, मी इंदापूर येथिल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात माझा शाळेचा दाखला काढण्यासाठी दि. ८ आक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजणेच्या सुमारास काॅलेजमध्ये  मी आलो होतो. त्यावेळी विवेक चौगुले व मिलिंद पवार (रा. दोघे इंदापूर, जि. पूणे) हे काॅलेजमध्ये माझ्याजवळ आले. व त्यातील विवेक चौगुले याने विचारले की, तु माझ्याबद्दल कोणाजवळ काहीही बोलतोस, असे म्हणत माझे कानाखाली जोरात चापट मारली. हाताने मारू लागला. त्यावेळेस मी त्याला विचारले की तु मला उगाच का मारतोस? परंतु त्यांनी माझे काहीही न ऐकता मला दोघांनी जमिनिवर खाली पाडून लाथा बुक्यानी मारहान करत असताना मी स्वत: ला वाचविण्यासाठी आरडा ओरडा करू लागलो. परंतु मला मारहान करणारे गुंड यांची इंदापुर शहरात मोठी दहशत असल्याने मला सोडवाण्यासाठी कोणीही आले नाही. त्यांचा दहशतीमुळे माझे आजु बाजुला असनारी मुले तेथून भिती पोटी पळुन गेली.

पिंपरी-चिंचवडच्या पोलीस अधिकाऱ्यांना खटारे वाहने

विवेक चौगुले व मिलिंद पवार हे मला मारत असताना मी त्यांचे तावडीतुन सुटका करून घेण्यासाठी पळायला लागलो असता आरोपी विवेक चौगुले याने शेजारीच पडलेली शहाबादी फरशी उचलुन माझे डोक्यात मारली.त्यामुळे सदर फरशीचा मार माझे डोक्याला लागल्याने माझे डोक्याला गंभिर दुखापत झाली आहे.त्या वेळी मी खाली पडल्याचे पाहुन वरील दोघेजन तेथुन पळुन गेले.याबाबतची फिर्याद मी इंदापुर पोलिस स्टेशनमध्ये समक्ष हजर राहुन वरील दोघाविरोधात दीली आसुन इंदापुर पोलिसांनी त्यांचेविरूद्ध कलम ३२६, ३२३, व ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करून घेतला आसुन आरोपिंना तात्काळ ताब्यात घेवुन अटक केली आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

गुंड विवेक चौगुलेवर इंदापूर पोलीसात आनेक गुन्हे दाखल

विवेक चौगुले हा इंदापुरातील सराईत गुंड व रोडरोमिओ आसुन त्याच्यावर आनेक गुन्हे दाखल आहेत. तर काही गुन्हे हे त्याने दहशतीच्या जोरावर बाहेरच्या बाहेरच मिटविल्याची चर्चा आहे. चार दोन रोडरोमाओंना सोबत घेवुन इंदापुर आय काॅलेज समोरील, बस स्थानक, बाबाचौक व शहरातील आनेक भागात याची दहशत पसरत आसुन अशा गुंडाना अभय कोणाचे? हा प्रश्न महत्वाचा आहे.अशा गुंडांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा व शहरात शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी अशा गुंडाचे गुन्हगारी रेकार्ड तयार करून त्यांचेवर कडक कारवाईचे धोरण इंदापुर पोलीसांनी अवलंबवावे अशी मागणी सध्या जोर धरत आहे.

[amazon_link asins=’B07BTZG2RS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3c30ee5c-cb72-11e8-9e09-b9bcf0b003a3′]

You might also like