सांगलीतील गुंडावर हल्‍ला करण्यासाठी गेलेल्या तिघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड दशरथ पवार याच्या वर हल्ल्यासाठी गेलेल्या तिघांना संजयनगर पोलिसांनी अटक केली. आकाश प्रकाश चव्हाण (वय १९), अक्षय अनिल सूर्यवंशी (१९), करण रामा पाटील (१९, तिघे रा. जुना बुधगाव रस्ता) अशी त्यांची नावे आहेत. पंचशीलनगर येथील दसरा चौकात ही घटना घडली.

गुंड दशरथ पवार याचा गुरुवारी तिघांसोबत वाद झाला होता. त्यातून बेकायदा जमाव जमवून त्यादिवशी दुपारी दोनच्या सुमारास पवारला मारण्यासाठी तिघेही गेले. पवार हा समोर दिसल्याने आरडाओरड करून संशयितांनी हातात कोयता, चाकू, एडका अशी धारदार हत्यारे घेऊन त्याचा पाठलाग केला. त्यांना पाहून पवार भीतीने रस्ता दिसेल तिकडे पळत सुटला.

दरम्यान, सूरज शेख यांच्या घरात तो लपून बसला. भीतीमुळे पवारने शेख यांच्या घराचा दरवाजा बंद केला. संशयितांनी शेख यांच्या घराकडे धाव घेत तेथे आरडाओरड केली. पवार हा आत लपल्याचे समजल्यानंतर संशयितांनी शेख यांच्या घराच्या दरवाजावर हल्ला करून काचा फोडल्या. त्यानंतर शेख तसेच पवारनेही फिर्याद दिली. संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता रविवारी त्यांना अटक करण्यात आली.

दिवसातील २४ तासांपैकी २३ तास तुमचेच, फक्त १ तास *शरीरा साठी द्या

 दीर्घश्वास घेणे शरीरासह मेंदू साठीही महत्त्वपूर्ण

जाणून घ्या : योग्य परफ्युम ची निवड आणि वापर कसा करावा

अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणार पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण

कडुबाई खरात यांच्यासह अनेक मातंग बांधव घेणार धम्मदीक्षा