नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘गुंडांच्या मिरवणुकीला परवानगी, परंतु शिवजयंती साध्या पद्धतीनं साजरी’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पासंदर्भात माहिती देण्यासाठी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विवध मुद्द्यांवर भाष्य करत शिवसेना आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, इंधन दरवाढ, शिवजयंती, सुशांत सिहं राजपूत प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

नारायण राणे म्हणाले, शिवसेनेचं सरकार आल्यापासून त्यांच्या ज्या ज्या मंत्र्यावर आरोप झाले त्याचं काय झालं. सुशांत प्रकरणी दिशाच्या केसमध्ये हत्याऐवजी आत्महत्याच सांगितली. हे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्याला पाठवबळ देत आहे. इथं कुंपनच शेत खातंय असं म्हणत त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून टीका केली.

पुढं बोलताना राणे म्हणाले, शिवसेना आणि हिंदुत्वाचा संबंध आता उरला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान-स्वाभिमान नसलेली शिवसेना आहे. बाळासाहेबांच्या वेळी वेगळी शिवसेना होती. आता संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चाला परवानगी दिली जाते. आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ मोर्चा निघतो त्याला परवानगी दिली जाते. मग शिवजयंतीला का नाही मिळत असा सवालही त्यांनी केला आहे.

इतकंच नाही तर शिवसेनेच्या सत्तेत साधू संतांच्या आणि शिवाजी महाराजांच्या मिरवणुकांना बंदी, पंरतु गुंडांच्या मिरवणुकांना परवानगी आहे असं म्हणत राणेंनी पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मिरवणुकीवरही टीका केली.