‘आधार’कार्ड घेऊन मतदानासाठी पोहचला 7 वर्षाचा मुलगा, ‘वोटर’ लिस्टमधील नाव पाहून अधिकारी झाले ‘हैराण-परेशान’

गोपाळगंज : वृत्तसंस्था – एक सातवर्षांचा मुलगा मतदान करण्यासाठी आधार कार्डसह बिहारमधील गोपाळगंजच्या हथुवाच्या पेऊली येथील केंद्रावर पोहचला असता त्याला पाहून येथील अधिकारी हैराण झाले. यावेळी त्याच्या हातात मतदानाची स्लीपदेखील होती. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे मतदारयादीतही या मुलाचे नाव होते.

रविवारी गोपाळगंजमध्ये प्राथमिक कृषी कर्ज सोसायटीच्या निवडणुकीसाठी चौथ्या भागातील मतदान सुरू असताना ही घटना घडली. मतदानासाठी हा मुलगा मतदान केंद्रावर आला असता उपस्थित अधिकारी त्याच्याकडे पहातच राहिले. काय प्रकार आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी चौकशी केली असता त्या मुलाने त्याचे नाव फैजल सांगितले. अधिकाऱ्यांनी त्याचे बोलणे रेकॉर्ड केले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या मुलाच्या वडीलांचे नाव ताज मोहम्मद आहे. अधिकाऱ्यांनी मुलास येथे कशाला आलास, असे विचारले असता या निष्पाप मुलाने मतदान करण्यासाठी आलो, असे सांगितले. मतदारयादीत त्याच्या नावासमोर वयाचा उल्लेख नव्हता. तर आधार कार्डमध्ये त्याची जन्म तारिख २०१२ नोंदविण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/