ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोपीचंद मोहिते यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उंड्री गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ह भ प श्री गोपीचंद सखाराम मोहिते यांचे आज पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास अल्पशः आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. उंड्री गावातील स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी उंड्री गावातील आणि पुणे शहर व जिल्हयातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. मोहिते यांच्या अंत्यसंस्कारास माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार महादेव बाबर, माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह अनेक प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

त्यांचा दशक्रिया विधी दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता उंड्री येथील स्मशानभुमीत ठेवण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, नातु, जावाई, नातवंड असा परिवार आहे.

Visit : Policenama.com

You might also like