Gopichand Padalkar | उदय सामंतांवर हल्ला करणारे शिवसैनिक नसून ती शरद पवारांची माणसं, गोपीचंद पडळकरांचा आरोप

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – काल पुण्यामध्ये उदय सामंत (MLA Uday Samant) यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला. तसेच त्यांच्या गाडीची काच फोडण्यात आली. यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. उदय सामंत यांच्यावर पुण्यात झालेला हल्ला शिवसैनिकांनी (Shiv Sainik) नाही तर शरद पवारांच्या माणसांनीच केला असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेच्या नावाखाली घोषणाबाजी करत असून त्यांनी सामंत यांच्या गाडीवर हल्ला केल्याचे पडळकरांनी म्हटले. ते आटपाडीत बोलत होते.

 

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची सुरु असलेली ‘निष्ठा यात्रा’ आणि आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गळ्यात भगवा मफरेल घालून घोषणाबाजी करत होते. ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे जात आहेत, तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. त्यामुळे हा झंजावात दौरा नाही, एकमेकांना हे फक्त मदत करत आहेत, असा टोला पडळकरांनी (Gopichand Padalkar) लगावला.

‘म्हसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा’ अशी अवस्था राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची (Congress) झाली आहे, अशा शब्दांत पडळकरांनी टीका केली.
तसेच पुण्यात आमदार सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यामागे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याचा आरोप त्यांनी केला.
पुण्यात शिवसेनेचे कार्यकर्ते नाहीत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत.
त्यामुळे त्यांच्याकडूनच हा हल्ला झाला असल्याचा आरोप करत याआधी आपल्यावरही हल्ले झाले.
ते राष्ट्रवादीकडूनच झाले होते, असा आरोपही पडळकरांनी केला.

 

Web Title : –  Gopichand Padalkar | attack on uday samants car in pune gopichand padalkar allegations on sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा