Gopichand Padalkar | ‘पवारांनो वेळीच सुधारा, अन्यथा …’ गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे आमदार (BJP MLA) गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि पवार कुटुंबियांवर नेहमीच निशाणा साधत असतात. आता ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation Maharashtra)  मुद्यावरुन गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)  यांनी पवार कुटुंबियांवर (Pawar Family) जहरी टीका केली आहे. पवारांनो वेळीच सुधारा, अन्यथा घराणेशाहीला वैतागून लोकांनी उद्रेक केला तर तुमची अवस्था श्रीलंकेसारखी होईल अशी टीका केली आहे. जर महाराष्ट्र पवारांची संस्कृती शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल असेही पडळकर यांनी म्हटले.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) पुढे म्हणाले, ओबीसी आरक्षणाची हत्या पवार यांनीच केली. आपल्या जवळच्या प्रस्थापितांना सत्तेत वाटा मिळावा यासाठीच पवारांची धडपड सुरु असून ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचं नाही, असा आरोप त्यांनी केला.

पवार कुटुंबियांवर टीका करताना पडळकर म्हणाले, पवार घारण्याला महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीवर बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही त्या संस्कृतीचे राहिलेले नाहीत. पवारांनी संस्कार व संस्कृती वर बोलू नये जर महाराष्ट्र (Maharashtra) पवारांची संस्कृती शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल. तुमच्याबद्दलची सगळी माहिती महाराष्ट्राला झाली आहे. पूर्वी लोक तुमच्या विरोधात बोलत नव्हते. श्रीलंकेतील घराणेशाहीला कंटाळून लोकांनी जसा उद्रेक केला तसे पवारांच्या घराणेशाहीच्या विरोधात लोक रस्त्यावर येतील असे पडळकर म्हणाले.

काँग्रेस (Congress) ही फक्त वसुली करण्यात मशगुल आहेत. इकडे ओबीसी आरक्षण गेले असताना तिकडे त्यांचे मंत्री फॉरेनला गेले आहेत. काँग्रेसची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. जेलमध्ये जाण्यापेक्षा येथे राज गादी मिळाली आहे, झोपायला बंगले मिळाले आहेत, अशा शब्दात पडळकर यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं.

Web Title : Gopichand Padalkar | bjp-gopichand-padalkar-criticised-ncp-sharad-pawar

 

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त