Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचा पुन्हा शरद पवारांना विरोध; सांगलीतील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे करणार अनावरण?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gopichand Padalkar | महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात अनेक कारणावरून खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतं. त्यातच भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आघाडी सरकारवर काही कारणावरुन हल्लाबोल करताना दिसत असतात. आजही गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना डिवचले आहे. शरद पवार यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमाला पडळकरांनी विरोध केला असून पुतळा अनावरण करण्याच्या तयारीत आहे. या कारणामुळे वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Rajmata Punyashlok Ahilya Devi Holkar) पुतळा अनावरण कार्यक्रम सांगलीमध्ये (Sangli) आयोजित करण्यात आला आहे. 2 एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. दरम्यान, त्याआधी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे पुतळ्याचे अनावरण करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. तर, पवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम करण्यास पडळकरांनी विरोध दर्शविला आहे.

दरम्यान, याआगोदर जेजुरीमध्ये (Jejuri) गोपीचंद पडळकरांनी स्वत:च मेंढपाळ आणि महिलांना सोबत घेऊन
आदल्या दिवशी 12 फेब्रुवारी रोजी पुतळ्याचे अनावरण केल्याचं जाहीर केलं होतं.
त्यावेळी 13 फेब्रुवारीला शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार होतं. त्यानंतर राष्ट्रवादी विरूद्ध पडळकर असा मोठं वादंग निर्माण झालं होतं.
आता पुन्हा एकदा शरद पवारांना होळकरांच्या पुतळ्याच अनावरण करू देणार नाही
असा पवित्राच पडळकरांनी घेतला असून पुतळ्याचे अनावरण मेंढपाळांच्या हस्ते की पवारांच्या हस्ते? यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

 

Web Title :- Gopichand Padalkar | bjp leader and mla gopichand padalkar again opposes sharad pawar will inaugurate the statue of Rajmata Punyashlok Ahilya Devi Holkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Returns | टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीने 11 दिवसातच गुंतवणुकदारांना केले मालामाल, एका वर्षात दिला 978 टक्के रिटर्न

 

Pune Corporation | ‘स्मार्ट पुण्यात’ 5 वर्षात फक्त 520 मीटरचा रस्ता विकसित ! अस्तित्वातील रस्त्यांच्या पुर्ननिर्माणावरच सत्ताधारी भाजपचा भर

 

Pune Corporation | पुणे महापालिकेने थकबाकीदारांचे तब्बल 27 गाळे केले सील; आंबेगाव येथील पुरंदर टेक्नीकल एज्युकेशनचे मैदानही घेतले ताब्यात