Gopichand Padalkar | आ. गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘निर्णय घेणारी सक्षम व्यक्ती या सरकारमध्ये नाहीये, त्यामुळे…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gopichand Padalkar | राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात निर्बंध लावले आहेत. त्याचबरोबर 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता भाजपचे (BJP) विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) जोरदार निशाणा साधला आहे. ‘गरिबांची मुलं कशी शिकणार याचा विचार सरकारने नियमावली बनवताना, शाळा बंद करताना केला पाहिजे. तर, सरकारमध्ये निर्णय घेणारी सक्षम व्यक्ती नसल्याचं म्हणत पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही (CM Uddhav Thackeray) अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला आहे.

 

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, ‘राज्यात कोरोना आल्यापासून सरकारचे धोरण हे पूर्णपणे गोंधळलेले धोरण आहे. नेमकं काय करावं? काय निर्णय घ्यावा? निर्णय घेणारी सक्षम व्यक्ती या सरकारमध्ये नाहीये. त्यामुळे सरकारचा हा गोंधळ अनेकदा उघडा होतोय,’ असा जोरदार निशाणा पडळकर यांनी साधला. तसेच, ‘आता दारुची दुकानं चालू आहेत आणि शाळा बंद करतायेत. आता या सगळ्या मराठी शाळांमध्ये मुलं ही गोरगरिबांची आहेत. या निर्णयामुळे पुढच्या पिढीचं केवढं मोठं नुकसान होणार आहे. पुढच्या 10 वर्षानंतर आपल्याला याचे परिणाम जाणवणार असल्याचंही ते म्हणाले.

पुढे बोलताना पडळकर म्हणाले, ‘श्रीमंतांची मुलं ऑनलाइन शिकतायत. ते क्लास लावतायत.
कुठून तरी पैसे भरुन त्यांची सोय करतायत, वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करत आहेत.
गरिबांची मुलं शाळेत जाऊन शिकतायत.
त्यांच्याकडे असल्या कोणत्या सुविधा नाहीत. खेडेगावात काही-काही ठिकाणी रेंज नाही.
काही मुलं त्यांच्याकडे मोबाईल नाहीये. त्यामुळे या सगळ्याचं प्रचंड मोठं नुकसान होतेय.
सरकारने या सर्वाचा सारासार विचार करुन या नियमावली तयार केल्या पाहिजेत.
तसे करताना सरकार दिसत नाही. हे वारंवार स्पष्ट झाल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :-  Gopichand Padalkar | BJP leader and MLC gopichand padalkar slams maha vikas aghadi government over closing of schools in state

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deltacron Corona Variant | कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘डेल्टाक्रॉन’ दाखल; डेल्टा आणि ओमिक्रॉन आले एकत्र मग…

 

Pune Crime | 50 वर्षीय महिलेचा निर्घृण खून, बारामती तालुक्यातील खळबळजनक घटना

 

शेतकर्‍यांना मिळू शकते का e-SHRAM Card, जाणून घ्या ई-श्रम पोर्टलचे नियम