Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचं अनिल परबांना आव्हान; म्हणाले – ‘किमान उद्धव ठाकरेंच्या शब्दांचा मान राखा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gopichand Padalkar | मागील दोन महिन्यापासून एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संपावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यासह कृती समितीची बैठक सोमवारी पार पडली. त्यावेळी पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचं आवाहन केलं. मात्र, MSRTC कर्मचारी अद्याप संपावर ठाम आहेत. यानंतर आता भाजपचे (BJP) विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मंत्री अनिल परब यांना आव्हान दिलं आहे.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, ‘एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा म्हणून सर्वजण दरवाजे ठोठावत आहेत. त्यापेक्षा अनिल परब यांनी स्वतः आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी (ST Workers) चर्चा का करत नाहीत ? त्यांनी कर्मचाऱ्यांना स्वतः भेटावं आणि बडतर्फीची कारवाई मागे घेण्यात येईल, असं आश्वासित करावं. त्यामुळे चर्चेचा मार्ग मोकळा होईल.

पुढे गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले होते की मी माझ्या मंत्र्यांना स्वतः मोर्चाला सामोरे जाण्यास सांगेल. माझ्या विनंतीचा नाही तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पाऊल पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा. त्यांच्यासोबत चर्चा करा आणि यावर तोडगा काढा,’ असं आव्हानच त्यांनी अनिल परब यांना दिलं.

तसेच, ‘एसटी कर्मचाऱ्यांनी एकजुटीनं लढा दिला. त्यामुळे त्यांचे अभिनंदन आहे. कुठल्याही युनियनची सभासद फी भरली नाही. महसुलात घट आणली. त्यामुळेच शरद पवारांना आज तुमच्या विषयाबद्दल खुलेआम तुमच्यासोबत चर्चा करण्यास भाग पाडले असल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे.

Web Title : Gopichand Padalkar | bjp MLA gopichand padalkar challenge to anil parab on st worker strike MSRTC

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Crime News | पोलीस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने घेतले जाळून

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये,
18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

CP Amitabh Gupta | आज रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडिओ)

Zero Rupee Note In India | झीरो रुपयाची नोट छापण्याची भारतात का भासली होती गरज? जाणून घ्या कारण

 

Deltacron Corona Variant | कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘डेल्टाक्रॉन’ दाखल; डेल्टा आणि ओमिक्रॉन आले एकत्र मग…