Gopichand Padalkar | मागासवर्गीय आयोगावरून गोपीचंद पडळकरांची अजित पवारांसह वडेट्टीवारांवर टीका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Gopichand Padalkar | अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केवळ वाहवा मिळवण्यासाठी मागासवर्गीय आयोगासाठी ४५० कोटींची घोषणा केली आहे. टक्केवारीसाठी वडेट्टीवार यांनी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची (Maharashtra Backward Classes Commission) अवस्था केली असल्याची टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. या आरोपांमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

आमदार पडळकर म्हणाले की, मागासवर्गीय आयोगासाठी ४५० कोटींची घोषणा केली. मात्र वास्तवात केवळ ४ कोटी दिले. पण त्यालाही खर्चाची मंजुरी दिली नाही. आयोगासाठी ना कार्यालय आहे ना पूर्णवेळ सचिव. आयोग पुण्यात तर संशोधक सोलापुरात. एकूणच टक्केवारीसाठी वडेट्टीवारांनी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं अशी केली आहे. उद्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सुनावणी होणार आहे. त्यासाठी सरकारने आयोगाकडे अंतरिम अहवाल मागितला होता. पण कामच सुरु नाही तर आयोग अहवाल कोठून देणार ? दिशाभूल करण्यासाठी न्यायालयाकडे वडेट्टीवार आणखी तीन महिन्यांची मुदत मागणार असल्याचे जाहीर केले, असा आरोपही त्यांनी केला.

 

आगामी निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण राहणार नसल्याचे सांगत पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, ओबीसींच्या राजकीय हक्कांवर प्रस्थपित डल्ला मारणार आहेत.
त्यामुळे आपल्या जीवावर लाल दिवा मिळवणाऱ्या आणि ओबीसी मंत्र्यांना जिथे असतील तेथे आडवा आणि जाब विचारा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

Web Title :- Gopichand Padalkar | BJP MLA gopichand padalkar criticizes minister vijay vadettiwar over state backward classes commission issue

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा