Gopichand Padalkar | ‘देवेंद्र फडणवीसांनी बहुजनांसाठी केलेले काम कुणी झाकू शकत नाही’ – गोपीचंद पडळकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gopichand Padalkar | ‘मागील अनेक वर्षापासून धनगरांचा एसटी आरक्षणाचा (ST Reservation) प्रश्न प्रलंबित आहे. परंतु भाजप सरकारच्या (BJP Government) काळात जे जे आदिवासींना ते ते धनगर समाजाला (Dhangar Society) मिळेल या धोरणांतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former CM Devendra Fadnavis) यांनी धनगर समाजासाठी 22 योजना लागू केल्या होत्या. तेव्हाचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Finance Minister Sudhir Mungantiwar) यांनी अर्थसंकल्पात (Budget) त्यासाठी एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली. यानंतर सरकार बदललं आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन झाले. महाविकास आघाडी सरकारने धनगरांसाठी लागू असलेल्या योजना बंद केल्याचा आरोप गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्याकडून सातत्याने होत आहे.

 

आता राज्यात भाजपचे पुन्हा सरकार आले आहे. त्यामुळे धनगरांसाठी बंद केलेल्या योजना (Scheme) पुन्हा सुरु व्हाव्यात यासाठी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पाठपुरावा केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले की, जे जे आदिवासींना ते ते धनगर समाजाला या धोरणांतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजासाठी लागू केलेल्या 22 योजना प्रस्थापितांनी बंद केल्या होत्या. त्या आता परत लागू करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. तुम्ही बहुजन समाजासाठी केलेलं काम कुणी झाकू शकत नाही असं कौतुक पडळकरांनी फडणवीसांचे केले आहे.

 

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) यासंदर्भात पत्रक काढले असून मागास बहुजन कल्याण संचालनालयाला कळवलं आहे. यामध्ये धनगर समाजासाठी लागू केलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या 30 जुलै 2019 च्या बैठकीत झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने आदिवासी विकास विभागामार्फत अनुसुचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनेच्या धर्तीवर धनगर समाजासाठी योजना लागू करण्यास सांगितले आहे.

 

या आहेत धनगर समाजासाठीच्या योजना

वसतीगृहापासून (Hostel) वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वित करणे
बेघर कुटुंबीयांना 10 हजार घरकुले बांधून देणे
धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देणे
धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे, नागपूर व अमरावती या ठिकाणी वसतीगृह निर्माण करणे
आवश्यकता असलेल्या मात्र अर्थसंकल्पात निधी उपलब्ध नसलेल्या योजना राबवण्यासाठी न्युक्लिअस बजेट योजना (Nucleus Budget Scheme)
युवक-युवतींना लष्करातील भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी (Police Recruitment) आवश्यक मुलभूत प्रशिक्षण देणे
स्टार्ट अप इंडिया च्या (Start Up India) योजनेतून समाजातील नवउद्योजकांना सहाय्य करण्यासाठी मर्यादेत निधी उपलब्ध करुन देणे
होतकरु बेरोजगार तरुणांना स्पर्धा परिक्षेसाठी परिक्षा, निवासी प्रशिक्षण देणे, परीक्षेसाठी आर्थिक सवलती उपलब्ध करणे

 

Web Title : –  Gopichand Padalkar | bjp mlc gopichand padalkar praised deputy cm devendra fadnavis for his work for bahujan samaj

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा