Gopichand Padalkar | पडळकरांच्या मागणीवर सरकार सकारात्मक; उस्मानाबाद, औरंगाबाद या जिल्ह्यांनंतर बदलणार ‘या’ जिल्ह्याचे नाव

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन | राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी केली होती. त्यावर सरकारने अहमदनगर जिल्हा प्रशासनाला महापालिकेच्या महासभेत ठराव मंजूर करून त्याची प्रत सरकारकडे दाखल करण्यास सांगितले होते. त्यावर सरकार सकारात्मक असून तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात जाहीर केले होते. (Gopichand Padalkar)

अहमदनगर येथील एकाही स्थानिक नेत्याची नामांतरणाची मागणी नसल्याने याबाबत सरकारमध्ये काहीसं गोंधळलेलं वातावरण आहे. अहमदनगरचे नाव सर्वप्रथम अंबिका नगर करण्याची मागणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे औरंगाबाद येथे बोलताना केली होती. तीच मागणी आजही शिवसेना मांडताना दिसत आहे. आणि आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी(Gopichand Padalkar) अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे करण्याची मागणी विधानपरिषदेत बोलताना केली आहे. आणि त्यांच्या या मागणीबाबतही सरकार सकारात्मक असल्याचे समजते.

पडळकरांनी(Gopichand Padalkar) विधानपरिषदेमध्ये बोलताना, नामांतराबाबत सरकारची भूमिका काय? असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना उत्तर देत म्हणाले होते की याबाबतचे पत्र अहमदनगर जिल्हा प्रशासनाला दिले असून त्याबाबतचा ठराव महापालिकेच्या महासभेत मंजूर करून त्याबाबतचे पत्र सरकारला सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

अहमदनगरच्या नामांतरणाबाबत जिल्हा भाजपने स्पष्ट भूमिका घेतली असली तरी इतर पक्षांनी मात्र याबाबत
सावध पवित्रा घेतला आहे. या बाबत सरकारने ठरावाची प्रत मागवल्याने आता महासभा बोलावली जाणार का?
तसेच या ठरावाबाबत स्थानिक नगरसेवकांची भूमिका कशी असणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
मात्र याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याने शासन स्तरावरच याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.
तसेच याबाबतची कुजबूज अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Gopichand Padalkar)

Web Title :- Gopichand Padalkar | cm eknath shinde government positive over bjp leader gopichand padalkar demand to change ahmednagar name

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sambhaji Raje Chhatrapati | ‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ या विधानावरून संभाजीराजे छत्रपतींनी अजित पवारांना ठणकावलं, म्हणाले…

Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याचे बारामतीत पडसाद; बारामतीतील घरासमोर त्यांचा पुतळा जाळून व्यक्त केला निषेध

Bro Gref Recruitment | पुण्यात ५६७ जागांसाठी लवकरच भरती; १० वी ते ग्रॅज्युएट पास करू शकणार अर्ज