पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची, भाजप नेत्याची राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर जोरदार टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात शहरी भागातील कोरोना नियंत्रणात आला असताना ग्रामीण भागात कोरोनाने हातपाय पसरले आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. ग्रामीण भाग कोरोनामुक्त करण्यासाठी राज्य सरकारने स्पर्धेचं आयोजन केले आहे. सरकारच्या या स्पर्धेवरुन विरोधी पक्ष भाजपने जोरदार टीका केली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (padalkar) यांनी टीका केली आहे. पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची झाली असून ‘सगळं गावच करील तर सरकार काय करील ?’ असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वेगाने वाढली कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे.
त्यातच ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे.
त्यामुळे ग्रामीण भाग कोरोनामुक्त करण्यासाठी सरकारने स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेवर पडळकरांनी (padalkar) एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोविड आणि लॉकडाऊनमुळे पूर्णपणे मोडला आहे. घरातील कित्येक कर्ते माणसं मृत्यूमुखी पडली आहेत.
त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी ग्रामीण जनतेच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा भरवली जात आहे, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

तर सरकार काय करणार ?

महाविकास आघाडीवर निशाणा साधताना पडळकर म्हणाले, पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची झाली असून ‘सगळं गावच करील तर सरकार काय करील ?’ तुम्ही जबाबदारी दुसऱ्यावर सोपवून काय काम करणार आहात, अशी स्पर्धा या कामचुकार मंत्र्यांनी का भरवली आहे. नेहमी प्रमाणे आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकून देण्याच्या उद्देशाने ही कोरोनामुक्तीची स्पर्धा योजना केली आहे.
अशी टीका पडळकर (padalkar) यांनी केली आहे.

निधी कोण देणार ?

या योजनेच्या व्यवस्थापनेचा सर्व 22 निकषांमध्ये या वसुली सरकारला शुन्य गुण आहेत.
आणि हे 22 निकष ठरवताना कुठेही या पथकांना व व्यवस्थापनेसाठी निधी कोण देणार ? ही बाब सोयीस्करपणे अंधारात ठेवली आहे, असा आरोप पडळकर (padalkar) यांनी केला आहे.

मृत्यू झालेल्या पत्रकारांना अद्याप मदत नाही

पडळकर पुढे म्हणाले, खरंतर या 50 लाखांच्या बक्षिसाबद्दल मला साशंकता आहे.
कारण ज्या पत्रकारांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे, त्यांना जीआर काढून 50 लाखाची मदत करतो सांगणाऱ्यांनी एक रुपायचीही मदत तर केलीच नाही पण कुटुंबियांना साधी भेटही दिली नाही.
ही स्पर्धा म्हमजे आशाच यांच्या भूलथापांच्या मालिकेचा एक भाग आहे, अशी टीका पडळकर (padalkar) यांनी केली.