बारामतीत अजित पवारांविरूध्द गोपीचंद पडळकर लढणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गोपीचंद पडळकर यांची भाजपात घरवापसी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पडळकरांन बारामतीतून निवडणूक लढवी असे सांगत बारामतीतून उमेदवारी घोषित केली. त्यामुळे पडळकर आता बारामतीतून अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढणार आहेत. विधानसभेनिमित्त अनेक नेते भाजपात प्रवेश करत आहेत. आज भापजमध्ये सर्वात मोठी मेगा भरती पाहायला मिळाली. वंचितला रामराम ठोकत अखेर गोपीचंद पडळकर यांनी घरवापसी केली.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, पक्षाची जर इच्छा असेल की मी बारामतीतून निवडणूक लढावी तर मी लढायला तयार आहे. त्यात मला कोणतेही आव्हान वाटत नाही. यावरुन गोपीचंद पडळकर पूर्ण तयारीत बारामतीत डेेरेदाखल होणार अशी शक्यता आहे.

भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया देताना पडळकर म्हणाले, भाजपात पहिल्यापासून कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. 2014 पूर्वी या राज्याची परिस्थिती अत्यंत वाईट होती. कोणी वाली भेटेल की नाही, असे वाटत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या विकासाचे काम करत आहेत. तर चंद्रकांत पाटील देखील राज्यात तळागाळात काम करत आहेत. धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून काम केले. महाड ते मुंबई रॅली काढली. आता सरकारने धनगर समाजाच्या पाठिशी उभे राहावे.

Visit : Policenama.com