Gopichand Padalkar | माजी पालकमंत्री जयंत पाटील यांना आताच्या पालकमंत्र्यासोबत बसायला लाज वाटते – आ. गोपीचंद पडळकर

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुरेश खाडे (Suresh Khade) यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या सत्काराचा एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे आमदार (BJP MLA) गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी देखील भाषण केले. यावेळी त्यांनी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर टीकास्त्र सोडले. माजी पालकमंत्र्याला आताच्या पालकमंत्र्यासमोर बसायला लाज वाटते, असे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले.

 

सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री होणे मोठी अवघड गोष्ट आहे. काल (दि. 14)  जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. यावेळी माजी पालकमंत्री आला नाही. कारण त्याला नवीन पालकमंत्र्यासमोर बसायला लाज वाटते, असे पडळकर (Gopichand Padalkar) जयंत पाटलांना म्हणाले. तसेच 2019 साली माझ्या हातून जी चूक घडली ती 2024 मी नक्की दुरुस्त करेन. आम्ही अन्याय सहन करणारे लोक नाही आहोत. आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात बोलणारे लोक आहोत. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गैरवापर करुन जर का भ्रष्टाचार आणि समाजद्रोही कामे करणार असाल, तर याद राखा गाठ माझ्याशी आहे, असे पडळकर यांनी महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) सुनावले.

 

यावेळी आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांनी देखील भाषण केले.
मी याठिकाणी कोणतीही राजकीय गोष्ट बोलणार नाही. कारण कोणत्या वेळी काय बोलायचे याचे मला भान आहे.
मी केवळी सुरेश खाडे यांना शुभेच्छा देणार आहे, असे अनिल बाबर म्हणाले.

 

Web Title :- Gopichand Padalkar | Former Guardian Minister Jayant Patil is ashamed to sit with the present Guardian Minister – Aa. Gopichand Padalkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Women Asia Cup 2022 | आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा उडवत टीम इंडियाने केला ‘हा’ पराक्रम

Nilesh Rane | निलेश राणेंची जीभ पुन्हा घसरली, भास्कर जाधवांना म्हणाले बिनकामाचा बैल, जयंत पाटील, अजित पवारांवर केली टीका

Chitra Wagh | कोणी जर मुली बाळींकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला, तर…, चित्रा वाघ यांचा इशारा