Gopichand Padalkar | ‘मी शिक्षकाचा मुलगा मला संस्कार शिकवू नये’ पडळकरांचं थोरातांच्या कन्येला जोरदार प्रत्युत्तर (व्हिडिओ)

सोलापूर (Solapur) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची कन्या शरयू देशमुख (Sharu Deshmukh) यांनी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर टीका केली होती. पात्रतेपेक्षा जास्त भेटलं की असं होतं, असं म्हणत शरयू देशमुख (Sharu Deshmukh) यांनी गोपीचंद पडळकरांना ( Gopichand Padalkar) संस्कार शिकवले होते.

Ajit Pawar | अजित पवारांची सीबीआय चौकशीची भाजपकडून मागणी; राष्ट्रवादीने दिली पहिली प्रतिक्रिया

यावर बोलताना पडळकर म्हणाले, राज्यातील काही घराणे हे अतिसुसंस्कृत आहेत. मी एका शिक्षकाचा मुलगा (son of teacher) आहे. तुमच्या विरोधात बोललो की लगेच असंस्कृतपणा दिसतो. त्यामुळे मला संस्कार शिकवण्याची गरज नाही, असे प्रत्युत्तर गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिले.

Mumbai News | मुंबईत पार्किंगमध्ये 48 जिवंत काडतुसं आढळल्याने मोठी खळबळ

 

शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार (Sharad Pawar) हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. त्यांचे तीन खासदार (MP) आहेत, त्यांना मोठं कोण मानणार.

Google चा मोठा खुलासा ! ‘OK Google’ बोलल्यानंतर कंपनीचे कर्मचारी ऐकतात तुमचं बोलणं

तुम्ही मानणार असाल तर मला त्याचं देणंघेणं नाही, असे म्हणत गोपीचंद पडळकर (Gopichand
Padalkar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. गोपीचंद पडळकर
(Gopichand Padalkar) सोलापूर (Solapur) येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

Pune Crime News | फ्लॅट भाडयाने घेण्याच्या बहाण्याने सायबर भामटयांनी 50 हजारांना फसवलं

काय म्हणाल्या होत्या शरयू देशमुख ?

आमच्या हाती सत्ता द्या, चार महिन्यात ओबीसी आरक्षण (OBC Reservation) मिळवून देतो जर
असं झालं नाहीतर राजकीय संन्यास (Political retirement) घेईन, असं वक्तव्य देवेंद्र
फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना
बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांनी वेगळा विदर्भ (Vidarbha) होईपर्यंत लग्न करणार नाही, केलेल्या विधानाची आठवण करुन
दिली.

Raju Shetti | सत्ता नसल्याने भाजपचे सगळे नेते ‘कासाविस’, राजू शेट्टी यांची भाजपवर टीका

या वादात उघडी घेत गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ट्विट करत, महसूल मंत्रीपदाच्या (Minister of Revenue) रस्सीखेचामुळे काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्र फडणवीस यांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षेआधीच झाले आहे. याचेही भान यांना राहिले नाही, अशी टीका केली होती.

Minister Varsha Gaikwad यांचे शिक्षणाधिकार्‍यांना आदेश, म्हणाल्या – ‘विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार्‍याना शाळांची मान्यताच रद्द करा’

गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख (Sharu Deshmukh) यांनी ट्विट करुन जशास तसे उत्तर दिले होते. त्या म्हणाल्या, पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरुन आपल्या संस्काराची ओळख होते. असो, ज्याचे त्याचे संस्कार..! असे ट्विट शरयू देशमुख यांनी करत पडळकरांना चांगलेच संस्काराचे धडे दिले.

Web Titel : Gopichand Padalkar | i am the son of a teacher should not teach me rites gopichand padalkars reply to thorats daughter sharayu deshmukh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update