Gopichand Padalkar | लवकरच राष्ट्रवादीच्या मुंबई आणि बारामती कार्यालयावर भाजपचा झेंडा असेल, गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे (BJP) विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीच्या मुंबई (Mumbai) आणि बारामती (Baramati) कार्यालयावर भाजपचा झेंडा फडकलेला असेल, तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या घरावर देखील भाजपचा झेंडा असेल, असे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले.

 

काही दिवसांनी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस विसर्जित करणार आहोत. राष्ट्रवादीतील 90% लोक भाजपमध्ये येणार आहेत. भाजपचा झेंडा राष्ट्रवादीच्या काही कार्यालयांवर लागला आहे. हा झेंडा काही दिवसांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर देखील लागेल. तसेच राष्ट्रवादीच्या मुंबई आणि बारामती कार्यालयावर देखील भाजपचाच झेंडा असेल, असे पडळकर म्हणाले. सांगली जिल्ह्यातील उगटी येथील सभेत गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) बोलत होते.

 

आमच्या सारखे छोटे कार्यकर्ते फिरले, तरी राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर भाजपचे झेंडे लागत आहेत. मागील आठ – दहा दिवसांअगोदर सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या होत्या की, माझे बाबा जर राज्यभर फिरले, तर पुन्हा आमची सत्ता येईल. त्यावर पडळकर म्हणाले, आता शरद पवारांना (Sharad Pawar) कार्यकर्त्यांना विचारावे लागेल की, आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस विसर्जित करावी लागणार आहे. तर आपण आता काँग्रेसमध्ये जायचे की भाजपमध्ये? मग त्यांच्यात वाद होतील आणि बहुमताने लोक म्हणतील की आपण भाजपमध्ये जाऊया. ही परिस्थिती पुढे येणार आहे, असे पडळकर म्हणाले.

पडळकरांच्या विधानावर राष्ट्रवादीने प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी म्हटले, गोपीचंद पडळकर प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्ये करत असतात.
सुदैवाने त्यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी राज्याचा, जिल्हाच्या आणि समाजाचा विकास करण्यावर लक्ष केंद्रीत करावे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची चिंता करु नये. राष्ट्रवादीचे काम जनता गेली अनेक वर्ष पाहत आहे.
गोपीचंद पडळकरांकडे लोकांना सांगायला स्वत:चे कर्तृत्व नाही, त्यामुळे ते राष्ट्रवादीवर टीका करत राहतात.
यातून त्यांनी किती प्रसिद्धी मिळवली हा चिंतनाचा विषय आहे.

 

Web Title :- Gopichand Padalkar | jayant patals house will have a bjp flag said bjp mla gopichand padalkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ambadas Danve | उद्धव ठाकरेंना घाबरुन ते तिघे एकत्र येतील, पण…,  ठाकरे-शिंदे-फडणवीसांच्या भेटीवर अंबादास दानवेंचा टोला

Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस फोडणे सोपं नाही, कारण…, आ. रोहित पवारांनी भाजपला सुनावलं

Narayan Rane | उद्धव ठाकरेंचे राजकारण मातोश्रीपूरते मर्यादीत, नारायण राणेंचे टीकास्त्र