‘ही’ भाजपची नवी खेळी ! पवारांविरोधात वापरणार 2014 चा ‘लोकसभा पॅटर्न’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध फडणवीस असा सामना रंगताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढवणार आहेत. बारामतीत अजित पवार यांची कोंडी करण्यासाठी भाजपने नवी खेळी केली आहे. नुकतेच वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेले गोपीचंद पडळकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अजित पवारांविरोधात ते बारामतीतून लढण्याची शक्यता आहे.

पवारांविरोधात भाजप वापरणार 2014 चा लोकसभा पॅटर्न

गोपीचंद पडळकर धनगर समाजाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांची निवडणूक केली आहे. बारामती मतदारसंघात मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजाची मतं आहेत. त्यामुळे पवारांना आव्हान देण्यासाठी भाजपकडून धनगर समाजातील नेत्यांना समोर करण्याचं कारण आहे ते म्हणजे या परिसरातील जातीय समीकरण. त्यामुळेच भाजप आता पडळकरांना मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.

लोकसभा निवडणूक 2014 मध्येदेखील भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघातून रासपचे नेते महादेव जानकर यांना मैदानात उतरवले होते. राज्यभर वातावरण निर्मिती केली होती. महादेव जानकर यांनी विजय खेचून आणला नसला तरी त्यांनी सुप्रिया सुळे यांना कडवी झुंज दिली होती. भाजपकडून थेट काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Visit : Policenama.com