Gopichand Padalkar | बहुजनांना एकत्रित आणण्यासाठी पुण्यात ‘मल्हार महोत्सव 2022 ‘चे आयोजन; गोपीचंद पडळकरांनी दिली माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gopichand Padalkar | महाराष्ट्रातील बहुजनांना एकत्रित करण्यासाठी, पंरपरा जोपासण्यासाठी ‘मल्हार महोत्सव 2022’ चे आयोजन करण्यात येत आहे. पुण्यातील बालगंधर्व (balgandharva rang mandir) येथे 15 आणि 16 जानेवारीला मल्हार महोत्सवाचं (Malhar Festival 2022) आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिली.

पोतराज, गोंधळी, बहुरुपी, गजीनृत्य, दशावतारं, लावणी, नंदीबैल, कडक लक्ष्मी, वासुदेव या परंपरा आपण जतन करायला हवं. या महोत्सवात ज्यांनी-ज्यांनी या क्षेत्रात योगदान दिले आहे त्यांच्या मुलाखती होणार आहेत. राज्यातील ज्यांनी या संस्कृतीचे जतन केले आहे. अनेक गावगाड्याच्या लोककला आहेत. त्या लोप पावत चालल्या आहेत. गावगाड्याचा आत्मा आहे हा? या लोककलावंताना आम्ही या महोत्सवाच्या माध्यमातून पाठबळ देणार आहोत. या कला जोपासणाऱ्या राज्यातील सर्व कलाकारासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करत असल्याचं पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सांगितलं आहे.

पुढे गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘बहुजनांना एकत्रित करणं गरजेचे आहे. जे याआधी कोणी केले नाही. आपण कितीही मोठं झालो तरी आपलं मूळ विसरता कामा नये. प्रत्येक समाजाचं वेगळंपणे आहे. प्रस्थापित समाजातून या परंपरा बाजूला पडतायेत. महाराष्ट्रात अनेक जातीधर्म आहे. लोककला, पेहराव, राहणीमान वेगवेगळे आहे. आपण कुठल्या परंपरेतून पुढे आलोय हे नवीन पिढीला कळायला हवं. अनेक दुर्लक्षित समाज या महोत्सवाच्या माध्यमातून पुढे येतील. ज्यांना या लोकसंस्कृती जतन करायच्या आहेत. जातपात, पक्षीय मतभेद विसरुन सगळ्यांना हात जोडून विनंती आहे त्यांनी या महोत्सवाला यावं तुमचं स्वागत करतो.

दरम्यान, ‘मल्हारी मार्तंड बहुसंख्य बहुजनांचे पालक आहेत.
वर्षभरातून एकदा तरी सर्व समुदायातील लोकं इथं दर्शनासाठी येतात.
यात कुठलेही राजकारण नाही. आम्ही एकत्र आले पाहिजे. संस्कृतीचं अदान-प्रदान झाले पाहिजे.
संवाद झाला पाहिजे. हा महोत्सव आम्ही सण म्हणून साजरा करतोय.
या महोत्सवाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. असं पडळकर यांनी सांगितलं.

 

Web Title :- Gopichand Padalkar | malhar festival 2022 organized pune bjp mla gopichand padalkar will bring bahujan together

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | 32 वर्षीय महिलेचा विनयभंग करणार्‍या चौघांवर गुन्हा दाखल; पुण्याच्या आंबेगाव पठार परिसरातील घटना

Sanjay Raut | ‘ED, CBI, NCB ही 3 चिलखतं दूर करा आणि आमच्याशी लढा’; संजय राऊतांचं अमित शहांना प्रत्युत्तर

Omicron Covid Variant | पाय पसरतोय ओमिक्रॉन ! पुण्याच्या जुन्नरमधील 5 वर्षाच्या मुलासह महाराष्ट्रात 6 नवीन केस, देशात आतापर्यंत 151 प्रकरणे