बारामतीमध्ये अजित पवार Vs गोपीचंद पडळकर ‘सामना’ रंगणार ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये आज प्रवेश करणारे गोपीचंद पडळकर हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज गोपीचंद पडळकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून भाजप तिकीट देणार आहे.

मात्र, पडळकरांसाठी हि निवडणूक सोपी नसून बारामती हा अजित पवारांचा बालेकिल्ला असून आतापर्यंत त्यांनी 5 वेळा विजय मिळवला आहे. त्याआधी शरद पवार देखील सहावेळा या मतदारसंघातून आमदार होते. त्यामुळे आता पडळकर त्यांना टक्कर देणार कि नाही पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना 1 लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे पडळकरांसाठी हि निवडणूक सोपी असणार नाही.

अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग बारामतीमध्ये असल्यामुळे पडळकर यांना याठिकाणी फार कष्ट घ्यावे लागणार आहेत. पडळकर यांनी याआधी मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना 3 लाखांच्या घरात मते मिळाली होती. त्यामुळे पडळकरांकडे मते घेण्याची ताकद आहे. मात्र अजित पवारांसमोरील हि लढाई फार अवघड आहे.

दरम्यान, भाजपने अजित पवार यांना पराभूत करण्यासाठी मोठी तयारी केली असून त्याठिकाणी ते मोठा जोर लावणार आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेचे देखील बारामती विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष लागून आहे.

Visit : policenama.com