मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि औरंगजेबाबाबत (Aurangzeb) केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यातच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच यावेळी बोलताना त्यांनी (Gopichand Padalkar) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला. ते माध्यमांशी संवाद साधत होते.
यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, ‘जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) आणि हिंदू देव, देवता यांच्याविषयी आक्षेपार्ह विधानं करत आहेत. कदाचित शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून हे सगळं बोलत असतील. असं मला वाटतं आहे.’ असं म्हणतं अप्रत्यक्षपणे त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
तर यावर पुढे बोलताना ते (Gopichand Padalkar) म्हणाले की, ‘जितेंद्र आव्हाडांना कदाचित हे माहीत नाही, की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हा जितुद्दीन झाला असता. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर अजितचा (Ajit Pawar) अझरुद्दीन झाला असता, शरदचा शमशुद्दीन झाला असता, रोहितचा (Rohit Pawar) रज्जाक झाला असता. परंतु मतांच्या राजकारणासाठी घाणेरडं विधान करणं, घाणेरडं राजकारण करणं ही पवारांची मागील ५० वर्षांतील कूट नीती आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या हिंदू लोकांनी हे सगळे विषय समजून घेतले पाहिजेत. मतांसाठी किती खालच्या पातळीवर जावं, हे पवारांकडून कशापद्धतीने मतासाठी राजकारण केलं जातयं हे महाराष्ट्रातील लोकांनी बघितलेलं आहे आणि आजही बघत आहेत, निश्चितपणे लोक त्यांना योग्य उत्तर देतील.’ अशी टीका यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबियांवर केली.
रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा.
दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा.
बाजुला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा
इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा#आवाज_बहुजनांचा_सन्मान_महाराष्ट्राचा
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 5, 2023
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केले आहे.
त्यात त्यांनी प्रभु राम, रावण, छत्रपती शिवाजी महाराज, आदिलशाही, मुघल अशा सर्वांचा उल्लेख केला आहे.
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा.
दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्ण-अर्जुन समजावून सांगा.
आदिलशाही आणि मुघल बाजूला काढून श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा.
इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वातंत्र्यलढा समजावून सांगा.’
असा मजकूर त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिला आहे. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
Web Title :- Gopichand Padalkar | maybe sharad pawar is saying all this through the mouth of jitendra awhad gopichand padalkar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Bigg Boss 16 | प्रेक्षकांसमोर डान्स करताना ‘शालीन – अर्चना ‘चा तोल गेला अन्…
Pune Nashik High Speed Railway | पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वेला केंद्राची तत्त्वतः मंजुरी