Gopichand Padalkar on Sanjay Raut | गोपीचंद पडळकरांचा खा. संजय राऊतांवर पलटवार, म्हणाले – ‘बहुजनांना तुमच्यासारखा काकांचा शकुनी हुजर्‍या समजू नका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gopichand Padalkar on Sanjay Raut | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena…
Gopichand Padalkar on Sanjay Raut BJP MLA gopichand padalkar reaction on shivsena mp sanjay raut
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gopichand Padalkar on Sanjay Raut | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut यांनी पुण्यातील (Pune) एका सभेमध्ये बोलताना, महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) हे बहुजनांचं सरकार असल्याचं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेते आणि विधानपरिषदेचे आमदर गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

 

महाविकास आघाडी सरकार हे बहुजनांचं सरकार असल्याचा दावा यांनी कालच्या सभेमध्ये बोलताना केला. कदाचित आम्हा बहुजनांनापण आपण काकाचा शकुनी हुजऱ्या समजत असाल. तुमच्या प्रस्थापितांच्या सरकारमध्ये 135 एसटी कर्मचाऱ्यांनी (MSRTC Worker) आत्महत्या केल्यात ते बहुजन नव्हते का ?, असा सवाल पडळकरांनी राऊतांना केला आहे.

 

महाविकास सरकारच्या अडेलतट्टू धोरणामुळेच एससी, एसटी, ओबीसी, (SC, ST, OBC) भटके विमुक्त यांचं पदोन्नतीतील आरक्षण मातीत मिळालं. ते तुमच्या बहुजन प्रेमातुन आलं होतं का ?, असं म्हणत पडळकरांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

 

दरम्यान, सरकार स्थापन करताना तुम्ही प्रस्थापितांसोबत दिल्ली वाऱ्या करून सरकार स्थापन केलं होतं.
मात्र जेव्हा बहुजनांच्या राजकीय आरक्षणाची वेळ येते तेव्हा कोर्टाचे तीन – तीन निर्णय आमच्या विरोधात येतात, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- BJP MLA gopichand padalkar reaction on shivsena mp sanjay raut

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

 

Total
0
Shares
Related Posts