Gopichand Padalkar On Sharad Pawar | “शरद पवार दाखवतात एक अन्…”; आमदार गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर निशाणा !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Gopichand Padalkar On Sharad Pawar | भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांच्यावर टीका करताना दिसतात. अशातच वाफगावमधील किल्ल्यावरून (Wafgaon Fort) त्यांनी बोलताना शरद पवारांवर टीका करत तो किल्ला राज्य सरकारने (Maharashtra State Government) ताब्यात घ्यावा, अशी मागणी गोपाचंद पडळकरांनी केली आहे.

 

शरद पवार यांना बहुजनांचा इतिहास (History of Bahujans) मोडीत काढायचा आहे. समाजाचा विरोध असतानाही पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं उद्घाटन त्यांनी केलं. महाराज यशवंतराव होळकर (Maharaj Yashwantrao Holkar) यांचा जन्मस्थान असलेला वाफगावचा किल्ला त्यांनी ताब्यात ठेवला आहे. करायचं एक आणि दाखवायचं एक अशी त्यांची प्रवृत्ती असल्याचं पडळकर म्हणाले.

 

जेजुरीमध्ये (Jejuri) जाताना वाफगावच्या किल्ल्याबाबत तुम्ही बोलत नाहीत. आता किल्ला राज्य सरकारच्या ताब्यात द्या नाहीतर आम्ही ताब्यात घेऊन किल्ल्याचा जिर्णोद्धार करू, असा इशाराही पडळकरांनी दिला. यशवंतराव होळकरांचा किल्ला सुबेदार होळकरांनी बांधला आहे. यशवंतराव होळकरांनी सलग 25 इंग्रजांशी लढा दिला आहे आणि तो जिंकलाही आहे, असंही पडळकर यांनी सांगितलं.

 

दरम्यान, गोपीचंद पडळकर विधानभवनासमोर (Vidhan Bhavan) आंदोलन करणार आहेत.
पडळकरांच्या या मागणीवर सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

Web Title :- bjp leader and mla gopichand padalkar criticism on ncp chief sharad pawar political news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा