Gopichand Padalkar On Sharad Pawar | पडळकरांची शरद पवारांवर जोरदार टीका; म्हणाले – ‘बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Gopichand Padalkar On Sharad Pawar | “बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय. पन्नास वर्षाचा त्याचा खेळ राज्यातील पोरांनी ओळखलाय,” अशा शब्दात भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 

पुण्यातील (Pune News) कामशेतमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात बोलताना आमदार पडळकर यांनी निशाणा साधला आहे. त्यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय. पन्नास वर्षाचा त्याचा खेळ राज्यातील पोरांनी ओळखलाय, असं म्हटलं आहे. गोपीचंद पडळकरांनी नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख मात्र शरद पवार यांच्यावर होता.

 

दरम्यान, ”आरपीआयसह राज्यातील विविध संघटना आणि चळवळी कोणी फोडल्या ?” असा सवाल देखील पडळकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच, संघटना आणि चळवळी फोडण्याचं हे काम 50 वर्षांपासून बहुजनांचा बुरखा पांघरून महाराष्ट्रात घुसलेल्या लांडग्याचं असल्याचं आमदार पडळकर यांनी म्हटलं आहे.

 

 

Web Title :- bjp leader gopichand padalkar criticism on ncp leader sharad pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा