Gopichand Padalkar On Sharad Pawar | आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली; शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Gopichand Padalkar On Sharad Pawar | भाजप नेते, आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) हे नेहमीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर टीका करत असतात. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला देखील केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा पडळकर यांनी खालच्या पातळीवर पवारांवर टीका केली आहे. नाशिक (Nashik News) येथे कांदा परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा उल्लेख करत पवारांवर निशाणा साधला आहे.

 

पडळकर म्हणाले, “विश्वासघातामुळे आम्ही विरोधी पक्षात बसलो. दोन वर्षांपासून विरोधी पक्षात असलो तरी आम्ही रडत बसलो नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत आहे. कांद्याचा प्रश्न अजूनही मिटला नाही. याच नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यावेळेस, रक्त न सांडता शेतकऱ्यांनी इकडे येऊन शरद पवार यांच्या …..वर लाथ घाला, असे बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटल्याचा,’ संदर्भ देत पडळकरांनी शरद पवारांना लक्ष्य केलं. ‘लाथ मारल्यानंतर शरद पवार बेशुद्ध पडतील आणि त्यावेळी त्यांना कांद्याचा वास द्या. ते शुद्धीवर येताच कांद्याचे दर वाढतील असे वादग्रस्त विधान केले. सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे रिमोट कंट्रोलवर काम करत असल्याचा,’ आरोपही त्यांनी केला.

 

चौंडीच्या कार्यक्रमावरुन पडळकरांची टीका..

चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गोपीचंद पडळकर अभिवादन करण्यासाठी आले होते.
सकाळी शरद पवार यांची सभा झाली.
त्यानंतर दुपारी पडळकर यांची सभा झाली. या सभेत पडळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.
“पवारांना आताच चौंडी का आठवली ? चार वेळा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
त्यावेळी ते एकदाही इकडे फिरकले नाही. 2022 मध्ये त्यांना कळले की चौंडी येथे कार्यक्रम होतात.
नातवाच्या प्रेमापोटी शरद पवार चौंडीला आले असल्याचा,” आरोप पडळकर यांनी केला.

 

Web Title :- Gopichand Padalkar On Sharad Pawar | gopichand padalkar criticism of sharad pawar in low language again padalkars tongue slipped

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा