Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘पोलिस अधिकार्‍यांसह जयंत पाटील आणि पवार कुटुंबियांकडून माझ्या हत्येचा कट’ (व्हिडीओ)

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी एक व्हिडीओ शेअर (Video Share) करत माझ्या हत्येच्या कटात सांगली एसपींसह (Sangli SP) पालकमंत्री जयंत पाटील (Guardian Minister Jayant Patil) आणि पवार कुटुंबीय (Pawar family) असल्याचा गंभीर आरोप (Serious Allegation) केला आहे. जर रक्षकच भक्षक बनत असतील तर त्यांच्याकडून संरक्षण कशाला घ्यायचं, असा सवाल उपस्थित करत गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) पोलिसांचा अंगरक्षक नाकारला आहे.

 

आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हीडीओवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, 7 नोव्हेंबर 2021 रोजी माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा हा व्हिडीओ आहे. आटपाडी पोलीस चौकीसमोर (Atpadi Police Station) हा हल्ला झाला. व्हिडिओमध्ये किती सुनियोजीत हल्ला (Attack) होता हे दिसून येत आहे. ज्या दिशेने माझी गाडी येत होती त्याच्या दुसऱ्या बाजूने 200 लोकांचा जमाव काठ्या घेऊन उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगड फेकायचे. मग माझ्या गाडीचा वेग कमी होताच भरधाव वेगाने ट्रक अंगावर घालायचा. नंतर जमावाकडून हल्ला करवून घ्यायचा,असा सुनियोजित हा कट आखला होता. विशेष म्हणजे हि घटना रोखण्याऐवजी पोलीस चित्रीकरणात मग्न असल्याचे दिसत होते. हा सगळा कट पोलिसांच्या संरक्षणात घडवून आणला जात होता, असा आरोप पडळकर यांनी केला आहे.

या हल्ल्यामध्ये पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम (SP Dixit Kumar Gedam), अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले (Additional SP Manisha Dubule) आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सहभागी आहेत. कारवाईच्या नावाखाली माझ्या बॉडीगार्डलाच निलंबित (Bodyguard suspend) केलं. तसेच माझ्यावरच कलम 307 अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला. अशा गंभीर आरोप पडळकर यांनी केला आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे पोलीस प्रशासनावरील विश्वास उडाला असून मी बॅाडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. कारण रक्षकच जर भक्षक बनत असतील तर त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा?. पण एका मात्र नक्की की, पवार-पाटलांविरूद्धचा लढा मी सुरू ठेवणार आहे.

 

आमदार पडळकरांचे आरोप पब्लिसिटी स्टंट: राष्ट्रवादी
आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेले आरोप हे पब्लिसिटी स्टंट (Publicity stunts)
असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.
पवार कुटुंबीय तसेच जयंत पाटलांचं नाव घेऊन पडळकर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
आणि अमित शाहा (Amit Shah) यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

 

 

Web Title :- Gopichand Padalkar | serious allegation gopichand padalkar conspiracy kill me jayant patil and pawar family along police officers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

GST | सोसायटीमध्ये राहत असाल तर मेंबर-फीमध्ये 2017 पासूनचा ‘जीएसटी’ द्यावा लागेल, 1 जानेवारीपासून नियम आणतंय सरकार, जाणून घ्या

Pune Crime | पुण्यात सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल; कर्ज खाते काढून 2.5 कोटी रुपयांची फसवणूक

Vitamin D Deficiency | ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे वाढतोय हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, दरवर्षी सुमारे 1.79 कोटी लोकांचा होतोय मृत्यू