Gopichand Padalkar | शरद पवारांनी बहुजनांच्या जिवावर राजकारण करत बहुजनांचाच घात केला : गोपीचंद पडळकर

आटपाडी : पोलीसनामा ऑनलाईन – गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे. शरद पवारांनी बहुजनांच्या जिवावर राजकारण करत बहुजनांचाच घात केला अशी टीका गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

शरद पवार नावाच्या जातीयवादी माणसानं आमचा घात केला. आजपर्यंत आमचे श्रद्धास्थान असलेल्या चौंडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर (Rajmata Ahilya Devi Holkar) यांची जयंती साजरी न करणारे पवार आज चौंडी आपल्या नातवाच्या ताब्यात देण्याचा डाव खेळत आहेत. शरद पवारांनी मराठा समाजाचेही मोठे नुकसान केले, अशी जाहीर टीका विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्याकडून करण्यात आली आहे. आरेवाडी येथील बिरोबा बनामध्ये (Biroba Ban) रविवारी आयोजित दसरा मेळाव्यामध्ये बोलत असताना त्यांनी हि टीका केली.

तसेच पडळकर पुढे म्हणाले आरेवाडीच्या बनामध्ये होत असणारा हा दसरा मेळावा वैचारिक परिवर्तनाचा मेळावा आहे. भविष्यात राजकीय परिवर्तनाचा केंद्रबिंदू आरेवाडी होणार आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील एका नेत्याने मेळाव्याला खोडा घालण्याचा प्रयत्न केला. शरद पवार आमचे वैचारिक शत्रू आहेत. मराठा समाजालासुद्धा त्यांनी फसवले. यांना फक्त आपल्या जवळची माणसे मोठी करायची आहेत. यांना बहुजनांचा पोरगा मोठा झालेला चालत नाही. आतापर्यंत बहुजनांच्या जिवावर राजकारण करत त्यांनी बहुजनांचाच घात केला.

बिरोबाच्या बनामध्ये होत असलेल्या दसरा मेळाव्याकडे (Dasara Melava) संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
भविष्यात आरेवाडीचा बन महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीचे आयटी सेल याठिकाणी लक्ष ठेऊन आहेत.
यावेळी या कार्यक्रमाला माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानद पडळकर,
माजी महापाैर संगीता खोत, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्राजक्ता कोरे, माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे,
अनिल पाटील, माऊली हलवनकर, वसंतराव कोळेकर, ढालगावचे माजी सरपंच सुभाष संकेत काळे, अजित मासाळ,
बापूसाहेब मेटकरी, सुरेश घागरे, सुभाष मस्के, दादासाहेब लवटे, अजित एडगे उपस्थित होते.

Web Title :- Gopichand Padalkar | sharad pawar betrayed the bahujans criticism of gopichand padalkar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Womens Asia Cup | टीम इंडियाने मलेशियाविरुद्धच्या सामन्यात आशिया कपमध्ये केला ‘हा’ नवा रेकॉर्ड

Dasara Melava 2022 | पुण्यात युवासेनेने शिंदे गटाच्या जखमेवर चोळले मीठ; मेळावे हे निष्ठावंतांचेच असतात, काळ…