Gopichand Padalkar | शरद पवारांचा ST च्या जागेवर डोळा म्हणून खासगीकरणाची चर्चा, गोपीचंद पडळकरांचा ‘हल्लाबोल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील पन्नास वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यावर (ST workers) अन्याय होत आहे. आम्ही बोललो कि भाजप (BJP) त्यात राजकारण करतंय असा आरोप आमच्यावर होतो. कर्मचाऱ्यांचे निलंबन (suspension) व बडतर्फची नोटीस दिल्यावर आता सरकार एसटी महामंडळाच्या (MSRTC) खासगीकरणाची (Privatization) चर्चा करीत आहे. शरद पवारांचा (Sharad Pawar) एसटीच्या जागेवर डोळा असल्याने अशी चर्चा होत असल्याचा घणाघाती आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर (ST Workers Strike) गेले आहेत. जवळपास एक महिना झाला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपाच्या समर्थनार्थ भाजप आमदार (BJP MLA) गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे देखील संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत मुंबईत आझाद मैदानात (Azad Maidan) गेल्या 10 दिवसांपासून ठाण मांडून बसले होते. त्यानंतर ते आज संध्याकाळी पुण्यात आले.

पडळकर म्हणाले, ह्या सरकारला सत्तेचा माज आला आहे. कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात आहे. कोल्हापूरला झालेल्या एसटी अधिवेशनात राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते 15 दिवसांत एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झाले पाहिजे. तसेच 2019 च्या जाहीरनाम्यात देखील राष्ट्रवादीने एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करु असे सांगितले होते. आता मात्र तेच विरोध करत असल्याचे पडळकर म्हणाले.

सरकारची सेवा समाप्त करा

आपल्या न्याय मागण्यांसाठी हक्काचा लढा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर सरकार अन्याय करीत आहे. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. काहींचे निलंबन तर काहींची सेवा समाप्त केली जात आहे. तेव्हा कर्मचाऱ्यांनो जागे व्हा. तुमची सेवा समाप्त करणाऱ्या सरकारचीच सेवा समाप्त करा, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले.

शरद पवारांनी कर्मचाऱ्यांवर अन्याय केला

एसटी आंदोलनात मानवतेच्या भावनेतून सहभागी झालो आहे. सरकार वेडेपिसे झाले आहे. त्यांना सुचायचे बंद झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) पायाखालची वाळू सरकली आहे. पवारांची मोठी मान्यताप्राप्त संघटना आहे. पवारांनी आजवर मान्यताप्राप्त संघटनेला हाताशी धरुन कर्मचाऱ्यांवर अन्याय केला. मात्र कर्मचाऱ्यांना आता अन्यायाची जाणीव झाली आहे. जर प्रश्न मिटला तर पवारंच्या संघटनेचं दुकान बंद होईल, त्यामुळे निर्णय घेण्यास अडचण येत असल्याचा घणाघाती आरोप गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवार यांच्यावर केला.

म्हणून खासगीकरणाची चर्चा सुरु

चर्चा काय करायची? विलीनीकरण हीच मागणी. दोन बैठकांत कर्मचाऱ्यांनी काय सांगितलं? एकच मागणी आहे. सरकार संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. रोज नव्या पुड्या सोडत आहे. कर्मचारी फुटत नाहीत म्हणून खासगीकरणाची चर्चा सुरु केली. एसटीतला भ्रष्टाचार थांबवला तरी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांइतका पगार मिळू शकेल. महामंडळ बापजाद्याची जहागिरी आहे का ?  आम्ही दहा दिवस आझाद मैदानावर, तरीही चर्चेसाठी सापडत नाही? 38 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तरी दु:ख संपत नाही, हे दुर्दैवी ! संपाचे नेतृत्व कर्मचारी करत आहेत. आमची सरकारसोबत चर्चेची तयारी परंतु सरकारला मार्ग काढायचा नसल्याचे पडळकर यांनी सांगितले.

 

Web Title : Gopichand Padalkar | Sharad pawars talk of st privatization eye msrtc place bjp mla gopichand padalkars attack

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील हॉटेल ‘पेंटहाऊस’ मधील त्रासाला कंटाळून वेटरची 13 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; हॉटेल प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ

N. Chandrababu Naidu | पत्नीच्या ‘अपमाना’मुळे रडले चंद्राबाबू नायडू; म्हणाले – ‘आता CM बनल्यानंतरच येईन विधानसभेत’ (व्हिडीओ)

Maharashtra Legislative Council Elections | महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोल्हापूर, ‘धुळे-नंदुरबार’, नागपूर, मुंबई आणि ‘अकोला-बुलढाणा-वाशीम’ येथून ‘या’ 5 दिग्गजांना भाजपकडून उमेदवारी; चित्रा वाघ यांना संधी नाही