Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांच्या कारवर सोलापूरमध्ये दगडफेक, गोळ्या मारल्यातरी गप्प बसणार नाही, पडळकरांची प्रतिक्रिया

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) हे आज सोलापूर (Solapur) दौऱ्यावर आहेत. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या गाडीवर आज (बुधवार) रात्री 8 च्या सुमारास काही समाजकंटकांकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक (mob attack and throwing stones) करण्यात आली. हा प्रकार सोलापूर शहरातील (Solapur City) मड्डी वस्ती परिसरात घडला आहे. या घटनेमुळे ताणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलिस (Solapur City Police) दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे सोलापूर (Solapur) दौऱ्यावर घोंगडी बैठकीसाठी आले होते. सकाळी सोलापूरामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. यातुनच हा प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील भाजपचे (BJP) कार्यकर्ते पडळकर यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. या हल्ल्यात गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना कोणतीही इजा झाली नसून त्यांची तब्येत उत्तम आहे.

 

गोळ्या मारल्या तरी गप्प बसणार नाही

या हल्ल्यानंतर पडळकरांनी (Gopichand Padalkar) प्रतिक्रिया देताना प्रस्थापितांवर हल्लाबोल केला आहे. विचारांची लढाई विचारांनी लढायला पाहिजे. परंतु दगडफेक (throwing stones) केली आहे. उद्या जरी गोळ्या घातल्या तरी भूमिका मांडण्यापासून थांबणार नाही, असा इशारा गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी यावेळी दिला आहे. पडळकर मागील काही दिवसांपासून राज्यातील नागरिकांचे प्रश्न मांडत असल्याने चर्चेत आले आहेत.

 

वैचारिक लढाई आहे तर विचाराने चला

पडळकर पुढे म्हणाले, या हल्ल्याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे याबाबत राज्याला माहित आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभर नागरिकांच्या बाजूने बोलत आहे. त्यांची बाजू मांडत आहे. प्रस्थापितांच्या विरोधात जाहीरपणे बाजू मांडल्यामुळे त्यांना आवडले नसेल. ते जे सगळे गप्पा मारतात लोकशाहीचे, फुले-शाहू-आंबेडकरांचे त्यांच हेच उत्तर आहे का ? अशा पद्धतीन उत्तर द्यायचे आहे का ? वैचारिक लढाई आहे तर विचाराने चला असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

Web Title :- Gopichand Padalkar | throwing stones on gopichand padalkars car

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नगरमध्ये महापौर, उपमहापौर निवडीपूर्वीच शिवसेनेत ‘राडा’ ! दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी

भारत बायोटेकला मोठा ‘झटका’ ! भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ब्राझिलने केला ‘कोव्हॅक्सिन’चा 324 मिलियन डॉलरचा करार रद्द

Pune Crime News | बुधवार पेठेतील ‘त्या’ महिलेच्या खुनाचा पर्दाफाश; सत्य आलं समोर

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट ! आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू